Malvani Prawns Curry Recipe: मासे म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते, यात बिन काट्याचे मासे अनेकजण आवडीने खातात. विशेषत: बऱ्याच लोकांना कोळंबी हा मच्छीचा प्रकार अधिक आवडतो. यामुळे कोळंबीपासून विविध पदार्थ तयार केले जाते. यात तुम्ही कोळंबी फ्राय, मसाला कोळंबी, कोळंबी राईस किंवा कोळंबीचे कालवण/ रस्सा यांसारखे कोळंबीपासून तयार होणारे पदार्थ ऐकले असतील, पण आज आम्ही तुमच्यासाठी रविवार स्पेशल अस्सल झणझणीत ‘मालवणी कोळंबी सार’ कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आलो आहोत. यामुळे चला जाणून घेऊन कसा बनवायचा मालवणी कोळंबी सार….

मालवणी पद्धतीने कोळंबी सार बनवण्यासाठी लागणारे साहित्य

१) अर्धा किलो नीट सोलून, स्वच्छ करुन घेतलेली कोळंबी

How to make paratha
प्रत्येक वेळी पराठे लाटताना फुटतात? मग ट्राय करून बघा ‘या’ टिप्स…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Boondi curry recipe in Marathi how to make Boondi curry recipe
रोज काय भाजी करावी सुचत नाही? घरात असलेल्या बुंदीची करा “बूंदी करी”; झक्कास होईल बेत
rava besan ladoo recipe in marathi
अगदी सोप्या पद्धतीने बनवा ‘रवा बेसन लाडू’, रेसिपी लगेच लिहून घ्या
Tawa Prawn Masala Recipe In Marathi)
नॉनव्हेज प्रेमींसाठी खास ‘झणझणीत तवा प्रॉन्स मसाला’ रेसिपी, रविवारी बेत कराच…
matar kachori recipe in marathi
कुरकुरीत खायची इच्छा होतेय? मग लगेच बनवा ‘मटार कचोरी’, सोपी रेसिपी लिहून घ्या
Fried Modak Recipe
Modak Recipe : माघी गणेश जयंतीला फक्त १ वाटी गव्हाच्या पिठाचे बनवा कुरकुरीत ‘मोदक’; रेसिपी वाचा पटकन
Khandeshi Shev Bhaji Recipe In Marathi
अस्सल झणझणीत खानदेशी शेव भाजी, रेसिपी वाचून तोंडाला सुटेल पाणी

कोळंबीच्या साराचे वाटण तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

१) अर्ध्या नारळाचे खोबरे
२) एक छोटा टोमॅटो
३) अर्धा कांदा
४) ५ ते ६ लसूण पाकळ्या
५) १ टी स्पून हळद
६) हिंग
७) दोन चमचे भिजवून घेतलेले धणे
८) एक टी स्पून हिंग
९) ५- ६ पाकळ्या तिरफळ
१०) १० बेडकी मिरची
११) आल्याचा एक छोटा तुकडा

साराच्या फोडणीसाठी लागणारे साहित्य

१) ३ लसणाच्या पाकळ्या
२) ४ ते ५ कोकम
३) कोथिंबीर
४) बारीक चिरलेले कांदा
५) चवीनुसार मीठ

कोळंबीचा सार बनवण्याची कृती

सर्वप्रथम बेडकी मिरच्या, धणे, तिरफळ गरम पाण्यात १० मिनिटे भिजत ठेवा. यानंतर या मिश्रणात ६-७ लसणीच्या पाकळ्या, आल्याचा एक छोटा तुकडा, टोमॅटो, हळद आणि एक चमचा हिंग मिक्सरमध्ये टाकून नीट वाटून घ्या, आता त्यात कांदा, किसलेलं खोबरं आणि थोडं पाणी टाकून पुन्हा हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करुन वाटण तयार करा.

आता कडईत तेल गरम करत ठेवा, तेल गरम होताच त्यात ठेचून घेतलेल्या लसणाच्या २-३ पाकळ्या टाका, या पाकळ्या थोड्या लालसर होताच त्यात अर्धा चिरून घेतलेला कांदा टाका. हे मिश्रणही दोन मिनिटे नीट परतून घ्या. आता त्यात तयार केले वाटण टाकून पुन्हा दोन मिनिटे नीट परतून घ्या. यानंतर ३-४ कोकम टाकल्यानंतर सोलून स्वच्छ केलेली कोळंबी टाका आणि तीही नीट परतून घ्या. आता चवीप्रमाणे मीठ टाका आणि मिश्रण पुन्हा नीट परता यामुळे कोळंबीतील उग्रपणा कमी होतो. यानंतर तुम्ही सार किती पातळ हवे आहे त्यानुसार पाणी टाका. आता या साराला उकळी येईपर्यंत शिजू द्या. यावर तुम्ही कोथींबीर टाकू शकता. अशाप्रकारे तयार झाले तुमचे अस्सल मालवणी पद्धतीने तयार केलेला झणझणीत कोळंबी सार…

Story img Loader