Homemade mango ice-cream : उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की, घरामध्ये मुलांचा धांगडधिंगा असतोच. मात्र, याच लहान मुलांसाठी आंबा म्हणजे पर्वणी असते. त्यांच्यासाठी घरोघरी आमरस, मिल्कशेक, फालुदा, आंब्याचा शिरा, असे विविध पदार्थ बनविले जातात. मात्र, तरीही या सर्वांमध्ये उन्हाची काहिली कमी करणारे मँगो आइस्क्रीम म्हणजेच आंब्याचे आइस्क्रीम किंवा कुल्फी हा थंडगार पदार्थ जवळपास सर्वांच्याच आवडीचा असतो.

चला तर मग आज घरच्या घरी आंब्याचे थंडगार आइस्क्रीम कसे बनवायचे याची रेसिपी पाहू. हे आइस्क्रीम बनविण्यासाठी अगदी मोजक्या पदार्थांचा वापर केला गेला आहे. तसेच हे गारेगार आइस्क्रीम बनविण्यासाठी फार कष्ट नसल्याचेही यूट्युबवरून शेअर झालेल्या या रेसिपी व्हिडीओमध्ये पाहून लक्षात येते.

हेही वाचा : Recipe : हॉटेलपेक्षा भारी दहीवडा घरच्याघरी बनवा! काय आहे साहित्य अन् रेसिपी, पाहा…

घरगुती मँगो आइस्क्रीम [Mango Ice-cream Recipe]

साहित्य

आंबा
साखर
मिल्क पावडर
फ्रेश क्रीम
दूध
आइस्क्रीम साचा

मुख्य स्टोरी

  • सर्वप्रथम दोन आंबे सोलून, त्याच्या बारीक फोडी चिरून घ्या.
  • आता या आंब्याच्या फोडी मिक्सरच्या भांड्यात टाका.
  • त्यामध्ये १/४ कप साखर, १/२ कप मिल्क पावडर, १/२ कप फ्रेश क्रीम व १/४ कप दूध घालून घ्या.
  • आता मिक्सरला हे सर्व पदार्थ चांगले एकजीव होईपर्यंत वाटून घ्या.
  • तयार झालेले आंब्याच्या आइस्क्रीमचे मिश्रण, आइस्क्रीम किंवा कुल्फीच्या साच्यामध्ये ओतून घ्या.
  • आइस्क्रीमच्या मिश्रणाने भरलेले साचे टेबल किंवा ओट्यावर हलकेसे आपटावेत. त्यामुळे मिश्रणात असलेले हवेचे बुडबुडे निघून जाण्यास मदत होते.
  • आता या साच्यावर एक फॉइल पेपर लावा. त्या फॉइल पेपरला कात्रीने थोडेसे कापून साच्यामध्ये आइस्क्रीमच्या काड्या टाका.
  • आता हे मिश्रण घट्ट होण्यासाठी फ्रिजरमध्ये किमान आठ तास किंवा रात्रभर ठेवून द्यावे.
  • मिश्रण पूर्ण घट्ट झाले की, फ्रिजरमधील साचा बाहेर काढून काही सेकंदांसाठी पाण्यामध्ये ठेवा. त्यामुळे साच्यातील तयार आइस्क्रीम सुटून येण्यास मदत होईल.
  • आता तयार आहे आपले घरगुती आंब्याचे थंडगार आइस्क्रीम.

हेही वाचा : Lunch box recipe : ‘चवळी मसाला’ सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी; कशी बनवावी पाहा

ही रेसिपी यूट्युबवरील sarikasevince9097 या चॅनेलने शेअर केली आहे.

Story img Loader