उन्हाळा जवळ येत आहे. उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होते. या हंगामात आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवणे खूप गरजेचे आहे. या ऋतूत हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. यासोबतच तुम्ही अनेक प्रकारच्या थंड पदार्थांचा देखील आहारात समावेश करू शकता. आज आम्ही तुम्हाला लोकसत्ताच्या पूर्णब्रह्मच्या अंकातून आंबा सरबत कसे बनवायचे याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे सरबत बनवायला अगदी सोपे आणि तुमच्या शरीराला थंड ठेवण्यास देखील मदत करेल. चला तर मग जाणून घेऊया याची सोपी रेसिपी..
साहित्य
- सहा तयार आंबे
- एक लीटर पाणी
- एक किलो साखर
- अर्श चमचा सोडियम बॅन्झोइट
- अर्धा चमचा सायट्रिक ऍसिड
कृती
सर्व सर्वात आधी आंबे पिळून घेऊन त्यांचा रस काढा. तो रस मोजून, गोडी पाहून त्याप्रमाणे दुसरीकडे सायट्रिक ऍसिड एकत्र करून गॅसवर ढवळत ठेवा. एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करा सोडियम बॅन्झोइट मिसळताना प्रथम अर्धा मिश्रणात ते टाकून विरघळवून मग सर्व मिश्रणात ते मिसळावं. पाक थंड झाल्यावर त्यात आंब्याचा रस एकत्र करा. आंबा चवीला गोड असल्याने हे सरबत तात्काळ अंगाला तरतरी देण्याचं काम करत. हे सरबत बराच काळ आपल्याला साठवून ठेवता येतं व हवं त्याप्रमाणे पाणी घालून घेता येतं.