गो शेक, आमरस, मँगो लस्सी, पायसम आणि चीझकेक यांसारखे आंब्याचे पारंपरिक पदार्थ मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहेत. याशिवाय, कच्च्या आंब्यापासून तयार केलं जाणारं लोणचं हे वर्षभर प्रत्येक घरातील जेवणाला आबंट-गोड चव देतं. एकूणच काय तर, उन्हाळ्यात जवळपास प्रत्येकजण आंब्यापासून तयार केलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतो. मात्र, या पारंपरिक पदार्थांव्यतिरिक्त आंब्यापासून काही ऑफबीट रेसिपीजही बनवता येतात. आंब्यापासून बनवलेले कैरी पन्ह, मँगो शेक, आईस्क्रीम किंवा मँगो स्मूदी असे सर्व प्रकारचे पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात, पण आंब्यापासून बनवलेला मँगो मोजिटो कधी ट्राय केलंय का? चला तर पाहुयात मँगो मोजिटो मॉकटेल कसं बनवायचं.
मँगो मोजिटो साहित्य
- आंब्याचे तुकडे
- क्लब सोडा, पुदिन्याची पाने
- लिंबाचा रस आणि साखरेचा पाक
- बर्फ, मीठ
मँगो मोजिटो कृती –
- सर्वप्रथम ब्लेंडरमध्ये, आंब्याचे ताजे तुकडे टाकून एक गुळगुळीत प्युरी तयार होईपर्यंत मिसळा.
- कॉकटेल ग्लास घ्या आणि त्यात ६ पुदिन्याची पाने, अर्धा लिंबाचा तुकडा, लिंबाचा रस आणि साखरेचा पाक एकत्र करा. दुसरा कॉकटेल ग्लास आणि उरलेले आंब्याचे तुकडे, पुदिना, लिंबाचा रस आणि साखरेच्या पाकात मिक्स करा.
- प्रत्येक ग्लासमध्ये अर्धी आंब्याची प्युरी टाका. आता बर्फाचे क्यूब आणि सोडा घालून मिक्स करा. टॉपला बर्फ घाला आणि मिक्स करा. सर्व्ह करण्यासाठी मँगो मोजिटो तयार आहे.
हेही वाचा – Summer drink: उन्हाळा सुरु झालाय ट्राय करा मसाला ताक, वजन कमी करण्यासाठीही होईल मदत
वापरून बनवले जाते. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत पार्टीची योजना आखत असाल, तर तुम्ही हे मॉकटेल बनवू शकता.