उन्हाळ्यात कैरी किंवा आंबा सहज मिळाणारे फळ आहे. कैरी किंवा आंबा नुसता खायला चांगला लागतोच पण त्यापासून तयार केलेल विविध पदार्थ देखील तितकेच चांगले लागतात. आपण कैरीच पन्हे, कैरीचं लोणचं, कैरीचा च्छूंदा किंवा आमरस असे पदार्थ नेहमी खात असतो. पण आता आम्ही तुम्हाला थोडा वेगळ्यापदार्थाबाबत माहिती देणार आहोत. हा पदार्थ आहे आंब्याचे रायते. सासम आणि रायते दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत. रायत्यामध्ये शक्यो रायवळ आंबा वापरतात. चला तर मग जाणून घेऊ या कसा तयार करावे आंब्याचे रायते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आंब्याचे रायते तयार करण्याची रेसिपी

आंब्याचे रायत्यासाठी लागणारे साहित्य
५-७ रायवळ आंबे सोलून अर्ध्याचा रस आणि अर्धे अख्खे ठेवावेत. साली पाण्यात भिजवत ठेवाव्यात. ओलं खोबरं १ वाटी, सुक्या मिरच्या आवडीनुसार, मेथी दाणे, २-४ हळद, गुळ, मीठ, हवी तर थोडीशी चंची,

फोडणीचे साहित्य – मोहरी, हिंग, कढीपत्ता

हेही वाचा – उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासह पचनक्रिया सुधारते ‘हे’ घरगुती पेय, जाणून घ्या रेसिपी

आंब्याचे रायते तयार करण्याची कृती
भिजत घातलेल्या साली त्याच पाण्यात पिळून घ्या. त्यात सोललेले अख्खे आंबे, रस घालून एकत्र करा, सुक्या मिरच्या किंचित कोरड्या भाजून ओलं खोबरं, हळद, गूळ यांच्यासोबत गुळगुळीत वाटा. आंब्याच्या रसात हे वाटप घालून सरसरीत करून मीठ घाला. तेल ( शक्यतो खोबरेल) तापवून त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता, मेथी दाणे घालून त्यावर आंबा रस (खोबरं वाटप लावलेला) ओता. हळद घालून एक उकळी काढा. जरा आधी चिरून ठेवल्यास मुरलेले रायते विलक्षण चवदार लागतात.