Crispy Masala Peanuts Recipe : लॉकडाऊनपासून अनेक कंपन्यांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ अजूनही सुरु आहे. तर काही कंपन्यांनी त्यांचे नियमित ऑफिस सुरु ठेवले आहे. ऑफिसचे काम घरून करत असो किंवा ऑफिसमधून जेवणानंतरच्या मधल्या काही वेळेत प्रत्येकाला भूक लागते आणि काही तरी चटपटीत खावेसे वाटते. त्यावेळी बाहेरचे चिप्स किंवा बिस्किटे आपण खातो. जर नेहमीच बाहेर खायचं नसेल तर तुम्ही १५ ते २० दिवस टिकणारे चटपटीत मसाला शेंगदाणे बनवू शकता. तर आज आपण अवघ्या ५ मिनिटांत बनणारे चटपटीत मसाला शेंगदाणे कसे बनवायचे याची सोपी रेसिपी पाहणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साहित्य –

१. पाव किलो शेंगदाणे
२. एक वाटी चण्याचे पीठ (बेसन पीठ)
३. अर्धी वाटी पाणी
४. तिखट (आवडीनुसार)
५. हळद
६. मीठ

कृती –

१. पाव किलो शेंगदाणे भाजून घ्या.
२. त्यानंतर शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर एक ताटात काढून घ्या.
३. एक भांडण्यात पाणी अर्धी वाटी, दोन चमचे तिखट मसाला, मीठ, हळद आणि एक मोठा चमचा चण्याचे पीठ आदींचे मिश्रण एकजीव करून घ्या.
४. नंतर त्यात भाजून घेतलेलं शेंगदाणे घाला.
५. एका कढईत एक चमचा तेल घाला.
६. तेल गरम झालं की, मिश्रण त्या तेलात घाला व कडक होईपर्यंत भाजून घ्या.
७. अशाप्रकारे पाच मिनिटांत तुमचे ‘मसालेदार शेंगदाणे’ तयार.

शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे –

सर्वसाधारणपणे शेंगदाण्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. शेंगदाण्यामध्ये भरपूर आवश्यक अमिनो ॲसिड, जीवनसत्त्वे ई, रिबोफ्लेविन, बी9 आणि भरपूर अँटिऑक्सिडंट्स आणि फिनॉल असते. तसेच फायबर, मोनो आणि पॉली-अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडस्, ओमेगा -३ फॅटी ॲसिडस्, खनिजे आणि आवश्यक अमिनो ॲसिडस् सुद्धा असतात. शेंगदाणे स्मरणशक्ती देखील सुधारतात. तसेच वयाशी संबंधित मानसिक आजारांवर मात करण्यास मदत होते. शेंगदाण्यामध्ये आढळणारे मोनो-अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड सारखे विशेष घटक खराब कोलेस्ट्रॉलला प्रतिबंध करतात. शेंगदाण्यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.