[content_full]
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
काही वस्तूंचं नातं अतूट असतं. उदाहरणार्थ राजकीय नेते आणि पांढरे कपडे, पाऊस आणि सर्दी, बॉस आणि माजुरडेपणा, हिरॉइन आणि नखरे, डुक्कर आणि उकिरडा, नवरा आणि सहनशक्ती वगैरे वगैरे. तसंच कुठल्याही सहलीचं काही पदार्थांशी अतूट नातं असतं. त्यातलेच प्रमुख पदार्थ म्हणजे पराठा आणि खाकरा. सहल म्हटली, की शाळेतल्या सहली आठवतात आणि अंगावर काटा येतो. त्यावेळी आत्ताच्या सारख्या कान्हा, दांडेली अभयारण्य, महाबळेश्वर, माउंट अबू वगैरे सहली नसायच्या. सहलीची पेटंट ठिकाणं म्हणजे एखादा साखर कारखाना, एखादा किल्ला नाहीतर प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ. सहलीत आपल्या डब्यापेक्षा दुसऱ्याच्या डब्यात काय आहे, याचीच उत्सुकताच जास्त असायची. दुसऱ्यानं सॅडविच, केक वगैरे काही (असा योग क्वचितच यायचा म्हणा!) आणलेलं असलं, की आधी त्याचा फडशा पाडून मगच आपल्या डब्याकडे वळण्यात जो आनंद असायचा, त्याची सर कशालाच नाही. अर्थात, आपला डबा उघडल्यानंतरही त्यातली पोळी आणि बटाट्याची भाजी बघून फार काही उत्साह वगैरे अंगात संचारण्याचा प्रश्नच नसायचा. तरीही पुन्हा आईकडून डबाच मिळणार नाही, या धाकापोटी तो रिकामा करावा लागायचा. कधीतरी, तिखटमिठाच्या पुऱ्या डब्यात असल्या, की ते पंचपक्वान्नच वाटायचं आणि थोडं मिरवताही यायचं. आता पोळी आणि बटाट्याच्या भाजीची जागा पराठ्यानं घेतली आहे. डब्यासाठी कमी तेलकट, जास्त टिकणारा आणि पहाटे कमी वेळेत तयार होणारा पदार्थ हवा असतो आणि ती गरज पराठे आणि खाकरे भागवतात. खाकऱ्यांचं सहलीशी घट्ट नातं असलं, तरी घरी बसल्या बसल्याही ते नुसते किंवा कांदा, टोमॅटो, शेव, चाट मसाला वगैरे घालूनही बसल्या बसल्या रगडता येतात. तुम्हीसुद्धा सहलीची तयारी करत असाल, तर खाकरे करायला शिकून घेऊया.
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- तीन वाट्या कणिक
- १ चमचा तिखट
- १ चमचा हळद
- चवीनुसार मीठ
- आवडीप्रमाणे जिरेपूड
- पाव चमचा ओवा
- पाव वाटी तेल
- एक चमचा हरभरा डाळीचे पीठ
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- सर्व मिश्रण एकत्र करून कणिक भिजवावी. तेल लावून चांगले मळावे.
- फुलक्यासाठी घेतो तेवढा गोळा घेऊन मध्यम जाडीची गोल पोळी लाटून तव्यावर मंद आचेवर भाजावी.
- स्वच्छ कापड घेऊन त्याने पोळीवर दाब द्यावा.
- गुलाबी रंगाची होईपर्यंत भाजावी.
- याचप्रमाणे पालक, टोमॅटो यांचा रस घालून खाकरा करता येईल.
[/one_third]
[/row]