How To Make Masala Milk Masala Doodh for kojagiri: कोजागरीच्या रात्री चंद्र, चांदण्याची शीतलता शरीराला मिळावी म्हणून त्याच्या छायेखाली बसून दूध आटवून ते पिण्याचा सल्ला दिला जातो. काहीजण साखर, सुकामेवा, जायफळ, वेलची,केशर याचबरोबर खास तयार मिल्क मसाला टाकूनही हे मसाला दूध करतात. कोजागरी पौर्णिमा म्हटलं की, सर्वांच्या डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे मसाले दुधाने भरलेला ग्लास. या दिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण मसाले दुधाचा आस्वाद घेण्यासाठी उत्सुक असतात. प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने मसाला दूध बनवतात व त्याचा आस्वाद घेतात. चला मग कोजागरी पौर्णिमेनिमित्त मसाला दूध बनवण्याची सोपी रेसिपी पाहूयात.

मसाला दूध तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

दूध – १ लिटर
दुधाचा तयार करुन घेतलेला मसाला – २ ते ३ टेबलस्पून
ड्रायफ्रुटसचे काप – २ टेबसलपून
केसर – १० ते १२ काड्या
साखर – १५० ग्रॅम
हळद – १/२ टेबलस्पून
ड्रायफ्रूट्स वापरुन तयार केलेला मसाला – २ ते ४ टेबलस्पून

मसाला दूध कृती

मसाला दूध बनविण्यासाठी सगळ्यात आधी दूध उकळायला ठेवा.

दूध थोडे आटवले तर ते अधिक छान लागते. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार दूध जेवढे पाहिजे तेवढे आटवून घ्या. पण खूप घट्ट रबडीप्रमाणे करू नका.

उकळणारे दूध जर दोन कप असेल तर त्यात दोन चमचे साखर टाका.

साखर टाकल्यानंतर दूध आणखी ८ ते १० मिनिटे उकळू द्या.

दूध उकळत असताना दुधाचा मसाला तयार करा.

मसाला तयार करण्यासाठी ८ ते १० अख्खे बदाम, १० ते १२ पिस्ते, ३ ते ४ इलायची मिक्सरमधून फिरवा आणि त्याची पूड तयार करुन घ्या. आता यामध्ये जायफळ किसून घाला. जायफळ साधारण पाव टिस्पून घ्या.

जायफळाची पूड आपण तयार केलेल्या मसाल्यात टाका आणि पुन्हा सगळा मसाला मिक्सरमध्ये फिरवून घ्या.

दुधाला उकळी आली की त्यात मसाला घाला. केशराच्या काड्या थोड्या दूधात अर्धा तास भिजायला घाला आणि नंतर ते या पातेल्यात उकळणाऱ्या दुधात टाका. केशर टाकल्यानंतर काही वेळ दूध उकळू द्या.

हेही वाचा >> इंस्टंट नूडल्स खाऊन मुलं होतात लठ्ठ? घरीच करा बटाट्याचे पौष्टिक नूडल्स; मुलंही आवडीनं खातील

त्यामुळे केशराचा रंग आणि फ्लेवर दुधात छान मिसळला जाईल. गरमागरम दूध कपात भरून सर्व्ह करा.