थंडी म्हटली की बाजारात जाऊन भाज्या आणायलाही मजा येते. हिरव्यागार भाज्या, निरनिराळ्या रंगाच्या भाज्या पाहूनच मन तृप्त होतं. पालेभाज्यांमधे ऑल टाइम फेव्हरिट भाजी म्हणजे मेथीची भाजी. थंडीत तर या मेथीचा रुबाब आणखीनच खुलतो. मस्त मोठ्या पानांची हिरव्यागार मेथीच्या मोठ्याला जुड्या स्वस्तात मिळतात. मोठी मेथीची जुडी आणली की भाजीला वापरुनही मेथी उरतेच. अशावेळी उरलेल्या मेथीचं काय करावं बरं असा प्रश्न पडतो. अशावेळी ही सोपी रेसिपी मेथीची कढी नक्की बनवा.

मेथी कढी साहित्य

Crispy Corn Recipe easy corn recipe for snacks
Crispy Corn Recipe: काहीतरी चटपटीत खायचंय? अवघ्या १० मिनिटांत बनवा मक्याची ‘ही’ रेसिपी
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
papaya sheera for breakfast
मुलांसाठी नाश्त्यात बनवा पपईचा पौष्टिक शिरा; वाचा साहित्य आणि कृती
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
diabetes patient can eat diabetic friendly jackfruit ladoo know how to make Green Moong ladoo recipe in marathi
रक्तातील साखर न वाढवता घ्या ‘गोडा’चा आस्वाद! डायबिटीज रुग्णांसाठी खास हिरव्या मुगाचे लाडू
Nutritious ragi cutlets recipe
फक्त ३० मिनिटांत बनवा नाचणीचे पौष्टिक कटलेट; वाचा साहित्य आणि कृती
Do you know how to make Chakali in the market
बाजारातील तयार चकल्या कशा बनवतात माहीत आहे का? पाहा VIRAL VIDEO तून ‘हा’ जुगाड
potato burger recipe
Potato Burger Recipe: बर्गरची ही नवीकोरी रेसिपी लगेच करा ट्राय! वाचा साहित्य आणि कृती

१ कप आंबट दही

२ चमचे बेसन

आले, लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट

हिंग, हळद, धणेपूड

ताजी मेथी

मीठ

तूप किंवा तेल

जिरे, धणे मोहरी

सुकी मिरची

लसूण, कांदा

काश्मिरी लाल मिरची पावडर

मेथी दाणे

पाणी

मेथी कढी कृती

कढी बनवण्यासाठी १ वाटी आंबट दही आणि २ चमचे बेसन एकत्र करून गुठळ्या न करता एकसारखे मिश्रण तयार करा. नंतर त्यात पाणी घालून पातळ द्रावण तयार करा. या मिश्रणात दीड कप पाणी घाला.

नंतर कढईत तेल गरम करून त्यात आले, लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घालून सुगंध येईपर्यंत परतून घ्या. आता त्यात हिंग, हळद आणि धनेपूड घालून मिक्स करा.

नीट ढवळून झाल्यावर त्यात बारीक चिरलेली मेथी घालून झाकण ठेवून साधारण ५ मिनिटे शिजू द्या.

मेथी शिजली की हळूहळू मंद ते मध्यम आचेवर बेसनाचे मिश्रण घाला आणि एक किंवा दोनदा उकळेपर्यंत सतत ढवळत राहा.

नंतर चवीनुसार मीठ घालावे. कढी शिजल्यावर त्यात मसाला घाला. असे केल्याने चव आणि रंग दोन्ही वाढतात. तडका तयार करण्यासाठी फोडणीच्या पातेल्यात थोडं तूप गरम करून त्यात जिरे, धणे आणि मोहरी घाला.

हेही वाचा >> खोकल्यावर औषधं घेऊनही आराम नाही? डॉक्टरांनी सांगितलेलं हे संत्र्याचं सिरप बनवा घरच्या घरी

नंतर सुकी मिरची, लसूण, कांदा, काश्मिरी तिखट आणि कसुरी मेथी घाला. ही फोडणी कढीवर घाला आणि पुन्हा एक उकळी आल्यावर गरमागरम भातासोबत सर्व्ह करा.

Story img Loader