– डॉ. सारिका सातव
साहित्य
* २ वाटी बेसन * १ मोठा चमचा दही
* पाव चमचा बेकिंग सोडा
* अडीच वाटी चिरलेली मेथी ल्ल २ चमचे साखर
* १ चमचा मीठ * २ चमचे तेल
* २ मोठे चमचे रवा * २ चमचे तीळ
* हळद, जिरे पावडर,
* धने पावडर – प्रत्येकी १ चमचा
* अर्धा चमचा लाल तिखट
* २ चमचे लिंबाचा रस
* कढीपत्ता ल्ल जिरे, मोहरी.
कृती
दही आणि कढीपत्ता सोडून सर्व साहित्य एकत्र मिसळून १५ – २० मिनिटे ठेवावे. नंतर दही आणि आवश्यकतेनुसार पाणी मिसळून मऊसर मळून घ्यावे. कोथिंबीरच्या वडय़ा करतात तसे पिठाचे लांबसर आकार तयार करून वाफवून घ्यावे. थंड झाल्यावर वडय़ांप्रमाणे कापावे. वरून कढीपत्ता, जिरे, मोहरीची फोडणी द्यावी किंवा परतून / तळून घ्यावे.
वैशिष्टय़े
* चवीस उत्तम ल्ल आबालवृद्धांसाठी उपयुक्त
* संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा छोटय़ा सुट्टीसाठी अतिशय आरोग्यदायी
* अ जीवनसत्त्व, कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात
* लहान मुले, दुग्धपान करणाऱ्या स्त्रिया, हृदयविकार, मधुमेह, रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रिया, मलावष्टंभ असणाऱ्यांमध्ये उपयुक्त.