अनेकांना पालेभााज्या खायला आवडत नाही, मेथीची भाजी म्हंटलं की लगेच नाक मुरडतात. तुम्हीही यापैकीच असाल तर मेथीपासून बसणारी रुचकर आणि पौष्टिक पाककृती म्हणजे मुठिया आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.. मूळ गुजरात प्रांतात बनणारा पदार्थ घरातील सर्वांना आवडेल असाच आहे. आज आपण मेथीचे मुटके पाहणार आहोत, ही एक गुजराती असून गुजरातमध्ये या रेसिपीला मेथी मुुठीया असे म्हणतात. ही रेसिपी बनवायला सोप्पी अन पौष्टिकही आहे. चला तर मग पाहुयात मेथीचे मुटके कसे बनवायचे.
मेथीमुठीया साहित्य :
- २ कप बारीक चिरलेली मेथीची पाने
- २ चमचे दही
- २ चमचे बेसन
- २ चमचे तांदूळ पिठ
- २ चमचे गव्हाचे पिठ
- १ चमचा तेल
- ३-४ लसूण पाकळ्यांची पेस्ट
- १ चमचा ओवा
- १ चमचा तिळ
- १ चमचा जिरे
- चवीपुरते मिठ
- तळण्यासाठी तेल
मेथीमुठीया कृती:
- मेथी धुवून, बारीक चिरून घ्यावी.
- त्यात सगळी पीठे, तीळ, जिरे, ओवा, मीठ, लसूण पेस्ट घालून लावून घ्यावे.
- कोरडे वाटल्यास दही वापरावे.
- या पीठाचे लांबट गोळे करून घ्यावे.
- हे गोळे चाळणीत किंवा कुकरमध्ये दोन शिट्ट्या घेऊन उकडून घ्यावेत.
- आता हे गोळे थंड झाल्यावर गरम तेलात तळून घ्या.
हेही वाचा – या उन्हाळ्यात ट्राय करा ‘कोकोनट मँगो पन्ना कोट्टा’ गरव्यासोबतच पौष्टीकताही
गरमागरम मेथी मुठिया सर्व्ह करा. हे मुठिया नुसते छान लागतातच पण टोमॅटो, शेजवान सॉस, चिंचगूळाची चटणी यासोबतही रुचकर लागतात.