भारतात बाजरीची लागवड उन्हाळी हंगामात केली जाते. बाजरी उत्पादनात भारत हा जगातील आघाडीचा देश आहे. भारतात सुमारे 85 लाख हेक्टर क्षेत्रात बाजरीचे पीक घेतले जाते. भारतातील महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बाजरीचं पिक घेतलं जातं…बाजरीचा आपल्या आहारात समावेश करणं फायदेशीर आहे. अशातच आपण आतापर्यंत फक्त बाजरीची भाकरी खाल्ली आहे. मात्र आम्ही तुमच्यासाठी बाजरीची नवी रेसिपी घेऊन आलोय. आता बाजरीची फक्त भाकरीच नाही तर बाजरीचे खुसखुशीत खाकरेही बनवा. चला तर मग पाहुयात कसे बनवायचे बाजरीचे स्वादिष्ट खुसखुशीत खाकरे.
बाजरीचे खाकरे साहित्य –
- 1 वाटी बाजरीचे पीठ
- 1 वाटी तांदळाचे पीठ
- आले आणि लसूण
- चवीनुसार मीठ
- मेथीची पानं
- धनेजिरे पूड
- थोडेसे तेल
- ओव्याची पूड
बाजरीचे खाकरे कृती –
बाजरीचा खाखरा बनवण्यासाठी सर्वप्रथम आले आणि लसूण स्वच्छ करून त्यात कोथिंबीर मिक्स करून त्याची पेस्ट बनवा. आता मेथीची पाने बारीक चिरून त्यात एक वाटी बाजरीचे पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचे पीठ घालून दोन्ही मळून घ्या.आता चवीनुसार मीठ, एक चमचा तेल, आले, लसूण आणि धणे आणि मेथीची पेस्ट घाला. यानंतर, सर्व साहित्य हाताने मिक्स करा. मिश्रण चांगले एकजीव झाल्यावर एका भांड्यात पाणी घेऊन गॅसवर कोमट गरम करा. पाणी कोमट झाल्यावर पीठ मळून घ्या. पीठ मळून झाल्यावर 15 मिनिटे बाजूला ठेवा. त्यामुळे म्हणजे बाजरीचे दाणे चांगले फुगतात. यानंतर पिठाचे छोटे-छोटे गोळे करून घ्या आणि कोरडे बाजरीचे पीठ लावून पातळ लाटून घ्या. त्यानंतर तव्यावर शेकावे. कडेने तूप सोडावे. सपाट तव्यावर सर्व पोळ्यांची थप्पी ठेवावी. अगदी थोडे तूप सोडून गोल गोल फिरवून लालसर करावे. लालसर झाल्यावर खालचा खाकरा काढून घ्यावा. अश्याप्रकारे सर्व खाकरे लालसर भाजून काढून घ्यावे. फक्त कणीक वापरुन असा खाकरा करता येईल.
आहारात बाजरीचे फायदे –
आहारातील बाजरी जास्तीत जास्त ऊर्जा देणारे पीक आहे. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रीत करते. रक्तदाब नियंत्रीत करण्यास मदत होते तसेच वजन नियंत्रीत करण्यास सुध्दा मदत होते. लहान मुले व गर्भवती मातांसाठी उपयुक्त आहे.