How to make mix vegetable soup recipe: शरीरात पोषणमुल्यांची कमतरता निर्माण होऊ नये, म्हणून भरपूर प्रमाणात सूप घ्यावे. सूप सेवन केल्यामुळे शरीरातील पाणी पातळीही संतूलित राहते आणि शरीरासाठी आवश्यक असणारी जीवनमुल्येही मिळतात. चला तर मग आज व्हेजिटेबल सूप कसे बनवायचे ते पाहूयात.
व्हेजिटेबल सूप बनवण्यासाठी साहित्य
तेल
लसूण पाकळ्या
आले
हिरवा कांदा
गाजर
बीन्स
शिमला मिरची
कोबी
मटार
पाणी
मीठ
व्हिनेगर
मिक्स हर्ब्स
चिली फ्लेक्स
काळी मिरी पावडर
कॉर्न फ्लोर
व्हेजिटेबल सूप बनवण्यासाठी कृती
१. सर्वप्रथम सर्व भाज्या धुवून बारीक चिरून घ्याव्यात. नंतर एका मोठ्या कढईत थोडे तेल गरम करून त्यात ४-५ लसूण पाकळ्या, आले आणि हिरव्या कांदा परतून घ्याव्यात. नंतर त्यात गाजर, बीन्स, शिमला मिरची घालून ढवळत एक मिनिट परतून घ्या.
२. आता त्यात कोबी, मटार, स्वीट कॉर्न घालून हलके परतून घ्या. नंतर त्यात पाणी घालावे. मीठ घालून नीट मिक्स करा. आता हे सूप झाकून भाज्या शिजेपर्यंत उकळून घ्या. मध्ये मध्ये ढवळा आणि तपासा.
३. सूपमधील भाज्या क्रंची असाव्यात, जास्त शिजवलेल्या भाजीची चव चांगली लागणार नाही.
४. भाज्या शिजत असताना कॉर्न फ्लोअर पाण्यात मिसळून बॅटर तयार करावे. भाज्या शिजल्यावर सूपमध्ये घालून घट्ट होईपर्यंत उकळून घ्या.
५. आता व्हिनेगर, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स आणि काळी मिरी पावडर घाला. ते चांगले मिक्स करा. नंतर शेवटी हिरवा कांदा घाला आणि सूपचा आनंद घ्या.
हेही वाचा >> Navratri Bhog Recipe: नवरात्रीत प्रसादासाठी बनवा अळीवाचे लाडू! खूप सोपी आहे ही रेसिपी
६. या सूपमध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या भाज्यांचा समावेश करू शकता आणि ज्या भाज्या आवडत नाही त्या स्किप करू शकता.