How To Make Moong Dal Pakode : शरीरातील प्रथिनांची कमतरता दूर करण्यासाठी आहारात डाळींचा समावेश करण्याचा सल्ला अनेकदा आहारतज्ञांकडून दिला जातो. शरीराला प्रोटिन्स मिळण्यासाठी डाळींचे आहारात सेवन उत्तम मानला जातो. डाळींचा आहारात समावेश केल्यानं शरीराला पोषक घटक मिळतात इतकंच नाही तर डाळींनी परीपूर्ण पदार्थ खाल्ल्यास बराचवेळ भूक लागत नाही. पोट भरल्यासारखं वाटतं. त्यातच मुगाची डाळ ही सगळ्या डाळींमध्ये पचायला हलकी असते. तुम्ही आतापर्यंत मुगाच्या डाळीचे वडे, खिचडी असे अनेक घरामध्ये खाल्ले जातात. पण, आज आपण मुगाच्या डाळीचे कुरकुरीत पकोडे बनवणार आहोत. चला तर जाणून घेऊया मुगाच्या डाळीचे कुरकुरीत पकोडे कसे बनवायचे ते.
साहित्य (Moong Dal Pakode Ingredients) :
१. मुगाची डाळ
२. मिरची
३. आल्याचा तुकडा
४. लसूणच्या पाकळ्या
५. मीठ
६. तेल
हेही वाचा…Kothimbir Bhaji : हिरव्यागार कोथिंबिरची कुरकुरीत भजी कधी खाल्ली आहे का? मग ही सोपी रेसिपी वाचा
कृती (How To Make Moong Dal Pakode ) :
१. एक वाटी मुगाच्या डाळ दोन तास भिजत ठेवा.
२. त्यानंतर मुगाची डाळ एका प्लेटमध्ये ठेवा.
३. मग मिक्सरच्या भांड्यात मिरची, आल्याचा तुकडा, लसूणच्या पाकळ्या, मीठ टाका.
४. त्यानंत मुगाची डाळ मिस्करच्या भांड्यात घाला आणि जाडसर मिक्स करून घ्या.
५. नंतर कढईत तेल घ्या.
६. मिश्रण चमच्याने किंवा हाताने तेलात सोडा.
७. गरमागरम मुगाच्या डाळीचे पकोडे (Moong Dal Pakode) तयार.
मुगाच्या डाळीचे आरोग्यदायी फायदे :
मुगाची डाळीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामुळे पचन आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. रक्तातील साखरेचे नियंत्रणात राहते. त्यातील उच्च प्रथिने आणि फायबर सामग्री वजन व्यवस्थापनात मदत करते, तर अँटिऑक्सिडंट्स रोग प्रतिकारशक्ती वाढवतात आणि शरीराला डिटॉक्सिफाई करतात. मूग डाळीमध्ये व्हिटॅमिन ए देखील असते, जे दृष्टी सुधारण्यास मदत करते. हे रातांधळेपणा टाळते आणि हाडे मजबूत करते. मूग डाळीमध्ये व्हिटॅमिन सी आढळते, जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. हे संक्रमणाशी लढण्यास मदत करते आणि जखम लवकर बरी होण्यास मदत करते. तर अशा आरोग्यदायी फायद्यांनी भरपूर मुगाच्या डाळीचे पकोडे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा.