[content_full]

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मूग गिळून गप्प राहणे, हा वाक्प्रचार आपल्याला नवीन नाही. विशेषतः विवाहित पुरुषांना तर नाहीच नाही! तसंही बोलण्यापेक्षा आपण गप्प राहण्यालाच जास्त प्राधान्य देत असतो. मग ते खाजगी आयुष्य असो, किंवा सार्वजनिक. त्यासाठी मूग गिळण्याचीही आपल्याला गरज नसते. अनेकदा समोर घडणाऱ्या कुठल्याच गोष्टीबद्दल आपल्याला काही म्हणायचं नसतं. हा वाक्प्रचार मुळात कुठून आला, त्याची एक गोष्ट सांगितली जाते. पूर्वीच्या काळात विद्याभ्यास करणारे शिष्य, संन्यासी मंडळी यांच्यामध्ये माधुकरी अर्थात भिक्षा मागून मिळेल ते अन्न खाऊन गुजराण करण्याची परंपरा होती. त्यांना फक्त पाच घरांमध्ये भिक्षा मागण्यासाठी परवानगी असे. या पाच घरांतून जे मिळेल, तेच खाऊन राहायचं आणि सहाव्या घरी त्या दिवशी तरी जायचं नाही, असा दंडक असे. म्हणून माधुकरी मागणारे आपल्या जवळ मोड आलेली कडधान्यं ठेवत, जेणेकरून काहीच अन्न न मिळाल्यास त्या कडधान्यांमुळे तरी भूक भागत असे. यात अनेकदा मूग असत. त्यावरूनच मूग गिळून गप्प बसण्याचा वाक्प्रचार पडला असावा, असा अंदाज. अर्थात, मूग गिळून आपण गप्प बसत असलो, तरी पोटात गेल्यानंतर मूग काही गप्प बसत नाहीत. त्यांचे हितकारक उद्योग ते सुरू करतातच. मुगामध्ये ए, बी व्हिटामिन, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, हे उपयुक्त घटक असतात. कफ, पित्त आणि रक्तासंबंधी विकारात मूग अत्यंत उपयुक्त आहेत. मूग आणि मूगडाळीचे अनेक प्रकार होत असले, तरी आज आपण एक वेगळाच पदार्थ शिकूया, मूगडाळीची इडली कम ढोकळा. हा ढोकळ्यासारखाच ढोकळा, पण हरभरा डाळीपेक्षा पचायला सोपा आणि हलका. इडलीपात्रातही हा होऊ शकतो, म्हणून इडली ढोकळा. करून बघा आणि आम्हाला नक्की कळवा.

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • १ वाटी मुगाच्या डाळीचे पीठ
  • अर्धी वाटी आंबट ताक
  • अर्धी वाटी कोमट पाणी
  • आलं
  • मिरची बारीक करून
  • अर्ध्या लिंबाचा रस
  • अर्धा टे.स्पून तेल
  • हळद
  • पाव चमचा खाण्याचा सोडा
  • तेलाची फोडणी
  • साखर 1 चमचा
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चवीपुरते मीठ

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • एक वाटी मुगाच्या डाळीचे पीठ, अर्धी वाटी आंबट ताक आणि अर्धी वाटी कोमट पाणी घालून भिजवून पातेल्यात ५ ते ६ तास झाकून ठेवावे.
  • पीठ फुगून वर आले की त्यात आले, मिरची, मीठ, हळद, अर्ध्या लिंबाचा रस, अर्धा चमचा तेल घालावे.
  • इडली पात्रात तळाला पाणी घालून गॅसवर ठेवावे, इडली पात्रातील ताटल्यांना तेल लावावे. पाण्याला उकळी आली की मिश्रणात सोडा घालून चांगले हलवून इडलीपात्रात ठेवावे. (पिठात सोडा अगदी पीठ इडली पात्रात घालायच्या वेळीच घालावा.)
  • ढोकळा तयार होतोय तोवर फोडणी तयार करून घ्यावी. लहानश्या कढल्यात किंवा लोखंडी पळीत १-२ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहरी, हिंग, हळद, घालून फोडणी तयार करावी. फोडणी किंचीत कोमट होऊ द्यावी. एका वाटीत २ चमचे पाणी, १ लहान चमचा साखर यांचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण फोडणीत घालावे.
  • १० ते १५ मिनिटांनी गॅस बंद करावा. १-२ मिनिटांनी पात्र बाहेर काढावे. इडली ढोकळा जरा गार झाला की पात्रातून काढून त्यावर तयार केलेली फोडणी चमच्याने पसरावी आणि कोथिंबीर घालावी.

[/one_third]

[/row]

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make moong idli dhokla maharashtrian recipes