हिवाळा असो किंवा पावसाळा सर्वांना आवडणारा आणि नेहमीच खावासा वाटणारा पदार्थ म्हणजे भजी. थंड वातावरणात भजी खाण्याची मजा काही औरच असते. आपण अनेकदा कांदा बटाट्याची भजी किंवा पकोडे करतो. पण तेच तेच खाऊन आपल्याला कंटाळा येतो. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी एक सोपी आणि भन्नाट अशी मुगाच्या पकोड्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. हे पकोडे बनवायला अगदी सोपे आणि चवीला चविष्ट आहेत. तुम्ही देखील कांदा किंवा बटाट्याची भजी खाऊन कंटाळलात असाल आणि मुगाचे पकोडे ट्राय केलात तर घरची मंडळी देखील खूप खुश होतील. चला तर मग जाणून घेऊया कसे तयार करायचे मुगाचे कुरकुरीत पकोडे..
जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य
- भिजलेल्या मूगडाळीचे जाडसर वाटण दोन वाट्या
- बेसन अर्धी वाटी
- लसूण जिऱ्याचं जाडसर वाटण दोन चमचे
- ओवा पाव चमचा
- मिरपूड पाव चमचा
- सैंधव चवीनुसार
- तीळ दोन चमचे
- बारीक चिरलेला कढीपत्ता
- पाणी
जाणून घेऊया कृती
- तेल वगळता अन्य साहित्य एकत्र करून मिश्रण बनवून घ्यावं
- कढईत तेल तापवावं
- तेलात मध्यम आकाराची भजी कुरकुरीत तळून घ्यावी.