Mushroom matar makhana recipe: रोजच्या जेवणाला काय वेगळं बनवावं सुचत नाही. त्याच त्याच चवीच्या भाज्या खाऊनही कंटाळा आलेला असतो.रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. अशावेळी मशरूम मटर मखाना रेसिपी ट्राय करा. बनवायलाही सोपी आणि टेस्ट ला तर कमालच. चला तर मग पाहुयात मशरूम मटर मखाना रेसिपी घरच्या घरी कशी बनवायची

मशरूम मटर मखाना साहित्य –

  • मशरूम १०० ग्रॅम, मखाणा अर्धा कप, भिजवलेले शेंगदाणे दीड चमचा, स्कीम्ड मिल्कचे दही पाव कप
  • कांदा चिरून १, फ्रेश टोमॅटो प्युरी अर्धा कप, धणे पूड २ चमचा लाल तिखट १ चमचा, गरम मसाला १ चमचा, हळद अर्धा चमचा
  • जिरे अर्धा चमचा, मिरपूड पाऊण चमचा, आले-लसूण पेस्ट २ चमचे, मध २ चमचे, लिंबाचा रह २ चमचे
  • बारीक चिरून कोथिंबीर ३ चमचे, तेल दीड चमचे, साजूक तूप १ चमचा, मीठ चवीनुसार,

मशरूम मटर मखाना कृती –

  • मशरूम स्वच्छ धुवून कापून, थोड्या पाण्यात उकळवून घ्या. थोड्या तेलावर मखाणा अर्धा मिनिट परतून घ्या. थोड्या पाण्यात बुडवून ठेवा.
  • दह्यामध्ये धणे, हळद, तिखट घालून घुसळून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून, जिरे घाला. कांदा घाला. पारदर्शक झाला की आले-लसूण पेस्ट घाला.
  • मशरूम घाला. ४ मिनिटे परतून दही घाला. तेल सुटेपर्यंत परत. टोमॅटो प्युरी घाला. मीठ घाला. परत तेल सुटेपर्यंत परता. १ कप पाणी घालून उकळवा.

हेही वाचा – ५ ते १० मिनिटांत बनवा स्वादिष्ट आणि पौष्टिक कडधान्याचा डोसा, ही घ्या सोपी रेसिपी

panvel water latest marathi news
पनवेलमधील पाणी पुरवठा बंद
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
Cockroaches are growing in the house These simple tips
घरात झुरळांचा सुळसुळाट वाढत चाललाय? ‘या’ सोप्या टिप्स करतील झुरळांचा नायनाट
health update on raw coconut eating
Health Special: पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे?
poster on the rickshaw
मीठ अन् साखर नव्हे हा आहे पाण्यात विरघळणारा पदार्थ, रिक्षावरील पोस्टरमुळे रंगली चर्चा, पाहा Viral Post
Monstrous bodybuilder dies of heart attack
बॉडीबिल्डर इलिया गोलेमचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; दिवसातून 7 वेळा करायचा जेवण; पण असं खाणं कितपत योग्य? वाचा डॉक्टरांचे मत
khandeshi style Gilkyache bharit recipe in marathi stuffed gilki recipe in marathi
खान्देशी पद्धतीचं झणझणीत गिलक्याचे भरीत; भाजी बनवायचा कंटाळा आला तर १० मिनिटांत बनवी ही रेसिपी
Ganpati rangoli from betel Leaves
Video : फक्त एका मिनिटात विड्याच्या पानांपासून साकारला गणपती, व्हिडीओ एकदा पाहाच
  • भिजवलेले शेंगदाणे आणि मखणा घाला. झाकण ठेवून ४- ५ मिनिटे शिजवा. गरम मसाला घाला. मध आणि लिंबाचा रस घाला. हलवून गॅसवरून उतरवा. कोथिंबिरीने सजवून खायला द्या !