Mushroom matar makhana recipe: रोजच्या जेवणाला काय वेगळं बनवावं सुचत नाही. त्याच त्याच चवीच्या भाज्या खाऊनही कंटाळा आलेला असतो.रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. अशावेळी मशरूम मटर मखाना रेसिपी ट्राय करा. बनवायलाही सोपी आणि टेस्ट ला तर कमालच. चला तर मग पाहुयात मशरूम मटर मखाना रेसिपी घरच्या घरी कशी बनवायची

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मशरूम मटर मखाना साहित्य –

  • मशरूम १०० ग्रॅम, मखाणा अर्धा कप, भिजवलेले शेंगदाणे दीड चमचा, स्कीम्ड मिल्कचे दही पाव कप
  • कांदा चिरून १, फ्रेश टोमॅटो प्युरी अर्धा कप, धणे पूड २ चमचा लाल तिखट १ चमचा, गरम मसाला १ चमचा, हळद अर्धा चमचा
  • जिरे अर्धा चमचा, मिरपूड पाऊण चमचा, आले-लसूण पेस्ट २ चमचे, मध २ चमचे, लिंबाचा रह २ चमचे
  • बारीक चिरून कोथिंबीर ३ चमचे, तेल दीड चमचे, साजूक तूप १ चमचा, मीठ चवीनुसार,

मशरूम मटर मखाना कृती –

  • मशरूम स्वच्छ धुवून कापून, थोड्या पाण्यात उकळवून घ्या. थोड्या तेलावर मखाणा अर्धा मिनिट परतून घ्या. थोड्या पाण्यात बुडवून ठेवा.
  • दह्यामध्ये धणे, हळद, तिखट घालून घुसळून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून, जिरे घाला. कांदा घाला. पारदर्शक झाला की आले-लसूण पेस्ट घाला.
  • मशरूम घाला. ४ मिनिटे परतून दही घाला. तेल सुटेपर्यंत परत. टोमॅटो प्युरी घाला. मीठ घाला. परत तेल सुटेपर्यंत परता. १ कप पाणी घालून उकळवा.

हेही वाचा – ५ ते १० मिनिटांत बनवा स्वादिष्ट आणि पौष्टिक कडधान्याचा डोसा, ही घ्या सोपी रेसिपी

  • भिजवलेले शेंगदाणे आणि मखणा घाला. झाकण ठेवून ४- ५ मिनिटे शिजवा. गरम मसाला घाला. मध आणि लिंबाचा रस घाला. हलवून गॅसवरून उतरवा. कोथिंबिरीने सजवून खायला द्या !
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make mushroom matar makhana easy step by step recipe in marathi srk
Show comments