Mysore Pak Recipe: बहुतांश मराठी घरांमध्ये मंगळवारी गोड पदार्थ केले जातात. हा दिवस गणपतीचा वार असतो असे अनेकजण मानत असतात. त्यामुळे मंगळवारी साध्या पद्धतीने जेवण बनवले जाते. जेवणासह नाश्त्यामध्येही काहीसे गोड पदार्थ खाल्ले जातात. आपल्याकडे गोड पदार्थ म्हटल्यावर शिरा, शेवया असे पदार्थ डोळ्यासमोर येतात. पण हे पदार्थ आपण नेहमीच खात असतो. त्यामुळे नाश्तामध्ये काहीतरी वेगळं खाण्याचा विचार करत असल्यास तुम्ही मैसूर पाक ही मिठाई रेसिपी करु शकता.

मैसूर पाक साहित्य

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
sharad pawar rain speech
Sharad Pawar: “मी बोलायला लागलो की पाऊस येतो आणि निकाल…”, शरद पवारांचं सूचक विधान; पावसातल्या ‘त्या’ सभेची पुन्हा चर्चा!
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
Marathi Actor Siddharth Chandekar Special Post share for amey wagh on his birthday
“जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…
shivani rangole shares beautiful birthday wish post for kavita medhekar
“ताई तुझ्याकडून कायम…”, ऑनस्क्रीन सासूबाईंसाठी शिवानी रांगोळेची खास पोस्ट! कविता मेढेकर कमेंट करत म्हणाल्या…
  • बेसन दीड कप
  • साखर दीड कप
  • देशी तूप एक कप
  • तेल एक कप
  • वेलदोडे पावडर लहान चमचा

मैसूर पाक कृती

  • पहिले साखरेचा पाक बनवून घ्या . साखरेला मोठ्या जाड कढाई मध्ये घाला. त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून आणि साखर पाक होण्यापर्यंत शिजायला द्या. तोपर्यंत एका बाऊल मध्ये बेसन ला घालून अर्ध तेल मिक्स करून त्याचा गोल बनवून घ्या. दुसऱ्या कढाई मध्ये तूप वितळण्यासाठी ठेवा . तूप वितळल्यानंतर राहिलेला तेल घाला आणि गरम होण्यासाठी ठेवा .
  • पाक ला चेक करून घ्या की तो व्यवस्थित झालेला आहे की नाही. दोन लहान बोटाच्या सहाय्याने चिकटवून बघा म्हणजे चांगला लांब तार निघत आहे का. लांब तार निघत असेल तर तुमचा पाक बनवून तयार आहे.आता पाक मध्ये बेसनचा घोळ घालून आणि सारखं हलवत रहा . भाजताना लक्ष ठेवा की बेसन कढाई मध्ये तळाला लागू नये करपू नये.
  • दुसऱ्या बाजूला गरम झालेल्या तुपात चमच्याने तूप भरून बेसन असणाऱ्या कढाई मध्ये घाला आणि बेसन ला सारखे हलवत भाजत ठेवा. गॅस बारीक आणि मीडियम हीट वर असायला पाहिजे . गरम गरम तूप बेसन मध्ये घालत हलवत राहा .
  • बेसन फुलल्या नंतर बेसन चा हलकासा रंग बदलायला लागतो. बेसन मध्ये जाळी बनायला लागते. म्हणजेच आपला मैसुरपाक तयार आहे ज्या थाळीत किंवा ट्रे मध्ये मैसूर पाक बनवायचा आहे त्यामध्ये थोडासा तूप घालून चारी बाजूने लावून घ्या.
  • गरम-गरम जाळी पडते आहे. बेसन ला थाळी मध्ये घाला आणि थाळीला एकसारखे करून घ्या.पाच दहा मिनिटानंतर मैसूर पाक गार होऊन जातो. मैसूर पाकला आपल्या मना सारखा आकार मध्ये कापून घ्या आणि मैसुरपाक जमल्यावर तुकडे वेगळे करून घ्या. मैसूर पाक बनवून तयार आहे.

हेही वाचा – बंगाली स्टाइल ‘फुलकोबी समोसा’, एकदा खाल तर खातच रहाल! पाहा सोपी मराठी रेसिपी

  • मैसूर पाक कला एयर टायर कंटेनर मध्ये भरून घ्या आणि महिन्याभरा पर्यंत मैसुरपाक ला कंटेनर मधून काढून खात राहा .