विदर्भीय लोक जेवणाच्या बाबतीत अतिशय आग्रही, बिनधास्त, बेधडक, एक रांगडा व्यक्तिमत्वाचे येथील लोक येणाऱ्या जाणाऱ्याशी सहज ओळख करून घेत. विदर्भातले जेवण” म्हणजे जहाल तिखटच, असं कित्येकांना वाटतं.’.. पण तसं नाही, काही विशिष्ट वर्गातले लोक तिखट खातात. विदर्भ म्हटलं की सावजी हे नाव हमखास येतच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीर वड्या ही विदर्भाची खासियतच. अशीच खास विदर्भाय रेसिपी म्हणजे..नागपूरची गरमागरम सांबारवडी..चला तर मग पाहुयात सावजी चमचमीत आणि तितकाच चवदार पदार्थ खास विदर्भ स्पेशल सांबारवडी
वडीच्या अवरणाचे साहित्य
- १ वाटी बेसन
- १ वाटी मैदा
- १ टीस्पून ओवा
- १ टीस्पून हळद
- २ टेबलस्पून तेल
- मीठ चवीनुसार
- सारणाचे साहित्य
- २ टेबलस्पून तीळ
- १ वाटी ओल खोबर (भाजून घ्या)
- २ वाट्या कोथिंबीर
- २ टीस्पून लाल तिखट
- १ टीस्पून हळद
- १ टेबलस्पून काळा मसाला
- मीठ चवीनुसार
- २ टीस्पून तेल
- वडी तळण्या साठी तेल
विदर्भ स्टाईल सांबार वडी कृती
स्टेप १
सर्वात आधी मैदा, बेसन, मीठ, हळद व ओवा मिक्स करून घ्या.यात आत्ता गरम तेलाचे मोहन घालून घ्या.
स्टेप २
घट्ट पीठ मळून घ्या.
स्टेप ३
मिश्रण करण्या साठी आधी पॅन मध्ये तीळ भाजून घ्या.मग ओलं खोबरं सुद्धा भाजून घ्या.
स्टेप ४
त्याच पॅन मध्ये थोड तेल घालून लाल तिखट, हळद व काळा मसाला परतून घ्या.त्या मध्ये खोबरं आणि तीळ घाला.
स्टेप ५
छान मसाला लागे पर्यंत मिक्स करून घ्या.आत्ता हे मिश्रण खलबत्ता मध्ये जाडसर वाटून घ्या किव्वा मिक्सर मध्ये केलं तरी चालेल.
स्टेप ६
या मिश्रणात आत्ता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ व एक चमचा तेल घालून एकत्र करून घ्या.
स्टेप ७
मळलेल्या पिठाचे एक सारखे गोळे करून घ्या.त्याच्या छोट्या पात्या लाटून घ्या.
स्टेप ८
पाती ला आतून तेल, काळा मसाला,व लाल तिखट याचे मिश्रण लावा.
स्टेप ९
आत्ता या पाती वर कोथिंबिरीच मिश्रण घाला.पोळी नीट सील करून घ्या.
हेही वाचा >> विदर्भ स्पेशल टमाटर लुंजी; एकदा खाल तर बोटं चाटत रहाल…ही घ्या सोपी मराठी रेसिपी
स्टेप १०
बाकीच्या वड्या करून घ्या.या वड्या मंद आचेवर तेलात तळून घ्या.
स्टेप ११
खरपूस सांबार वडी तयार. सॉस किंवा चटणी सोबत सर्व्ह करा.