How to make nankhatai at home: दिवाळीच्या फराळात नानकटाई अनेकजण बनवतात. पण घरी बनलेल्या नानकटाई नेहमी कडक किंवा जास्त तुपकट, दाताला चिकतात. परफेक्ट नानकटाई बनवणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. बाहेरच्या नानकटाईची चव काहींना फारशी आवडत नाही. मऊ, पांढरी नानकटाई बनवण्याच्या सोप्या ट्रिक्स आणि रेसेपी या लेखात पाहूया. घरातल्या पिठापासून बनवलेले नानकटाई अतिशय चवदार असते आणि ती खाल्ल्याबरोबरच तोंडात विरघळते. चला तर आज जाणून घेऊयात तोंडात विरघळणारी नानकटाईची रेसिपी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नानकटाई बिस्कीट साहित्य

२ वाटी मैदा
दीड वाटी तूप किंवा बटर (बटर वापरत असाल तर अनसॉल्टेड वापरा )
१ वाटी पिठी साखर
२ चमचे रवा
१/२ चमचा बेकिंग पावडर
१ चमचा वेलची पावडर
बदाम आणि पिस्ता काप
मीठ (चवीनुसार )

आता आपण वर दिलेले साहित्य वापरून नानकटाई बिस्कीट कशी बनवायची ते पाहूयात..

नानकटाई बिस्कीट बनवण्यासाठी कृती –

सर्वप्रथम एक बाऊल घ्या आणि त्यामध्ये दिड वाटी बटर आणि पिठी साखर घाला आणि ते चांगल बीटरने फेटून घ्या. जोपर्यंत हे मिश्रण पांढरे दिसत नाही तोपर्यंत फेटा.

आता त्यामध्ये मैदा आणि रवा घाला आणि हे मिश्रण गोळा होईपर्यंत बिटरने फेटा. आणि मग त्यामध्ये मीठ (चवीनुसार), बेकिंग पावडर, वेलची पावडर घाला आणि ते चांगले मळून घ्या.

आता बेकिंग ट्रे ला बटर लावून घ्या आणि पीठाचे पेढ्या एवढे बिस्कीट बनवून घेवून ती ट्रे मध्ये थोड्या थोड्या अनंतरावर ठेवा. आणि बिस्कीट मध्य भागी हलके अंगठ्याने दाबा.

मग ओव्हन १७० ते १८० डिग्रीवर प्री- हिट करा आणि त्या प्री हिट ओव्हनमध्ये ती बिस्किटे ५ मिनिटे भाजून घ्या.

पाच मिनिटांनी ती बाहेर काढा आणि त्यावर मध्यभागी बदाम आणि पिस्ता घाला आणि ती परत ओव्हनमध्ये घालून ५ ते ६ मिनिटे १८० डिग्रीवर भाजून घ्या.

हेही वाचा >> Coconut Jaggery Barfi : यंदा दिवाळीत बनवा तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी? नक्की ट्राय करा ‘ही’ रेसिपी; अगदी कमी मेहनत लागेल

५ ते ६ मिनिटांनी बिस्किटे चांगले भाजतील. ते भाजल्यानंतर ओव्हनमधून बाहेर काढा आणि मग ते थोडे गार होऊ द्या.
गार झाल्यानंतर ते आपण तसेच खावू शकतो.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make nankhatai at home how to make perfect nankhatai diwali faral recipe marathi srk 1