Coconut Saar : नारळाचा उपयोग आपण अनेक पदार्थांमध्ये करतो. नारळ हे पौष्टिक फळ आहे. नारळाची चटणी, नारळाचा भात, नारळाच्या भाज्या, एवढंच काय तर नारळापासून अनेक गोड पदार्थही बनवले जातात पण तुम्ही कधी नारळाचे सार खाल्ले आहेत का? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

साहित्य

  • नारळाचे दूध
  • आंबट ताक
  • हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • कढीपत्ता
  • तूप
  • जिरे
  • साखर
  • मीठ
  • कोथिंबीर

हेही वाचा : Daalmethi : पौष्टीक असलेली डाळमेथीची भाजी वाढवेल तुमच्या जेवणाचा स्वाद, एकदा करून पाहाच

कृती

  • कढईत तेल गरम करून जिरे, मिरच्या, कढीपत्ता घालून फोडणी द्या
  • त्यात नारळाचे दूध घालावे.
  • १ उकळी काढावी.
  • नंतर त्यात ताक घालावे.
  • पुन्हा उकळी येऊ द्यावी
  • उकळी आल्यावर चवीनुसार साखर आणि मीठ घालावे.
  • शेवटी कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

Story img Loader