Narali Bhat Recipe : नारळी भात हा पारंपारीक पदार्थ आहे. सणावाराला नारळी भात आवर्जून केला जातो. नारळी भात हा अत्यंत पौष्टीक असतो. हेल्दी आणि टेस्टी असणारा नारळी भात अनेकजण आवडीने बनवून खातात. अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे. आज आम्ही तुम्हाला गुळ टाकून नारळी भात कसा बनवायचा, हे सांगणार आहोत, चला तर जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य :

  • तांदूळ
  • गूळ
  • नारळाचा चव
  • तूप

हेही वाचा :Khajur Satori Recipe : खुसखुशीत खजुराच्या साटोऱ्या, जाणून घ्या ही सोपी रेसिपी

कृती :

  • तांदूळ अर्धा तास धुऊन ठेवा.
  • गॅसवर कढई ठेवा. यात दोन चमचे साजूक तूप घाला. लवंगांचे तुकडे करुन टाका
  • त्यानंतर तांदूळ घालून परतून घ्या.
  • त्यावर पाणी घालून मोकळा भात करून घ्यावा.
  • नारळाचा चव व बारीक गूळ एकत्र शिजवून घ्या.
  • त्यात तयार भात मोकळा करून घाला आणि त्यात वेलची पूड घाला.
  • गॅसवर तवा ठेवा आणि त्यावर भाताचे भांडे ठेवा.
  • भाताला चांगली वाफ आल्यानंतर भातावर थोडे तूप टाका आणि झाकण ठेवा पुन्हा चांगली वाफ आल्यावर गॅस बंद करा.
  • नारळी भात तयार होणार.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make narali bhat recipe sweet coconut rice healthy food for foodie ndj