Video Shows How To Make No Bake Cake : चॉकलेट केक म्हंटले की, आपल्या तोंडाला पाणी तर सुटतेच. आनंदाच्या दिवसाची मजा वाढवण्यासाठी आणि जोडीदाराला खुश करण्यासाठी आपण एखादा केक ऑर्डर करतोच. पण, जास्त क्रिम असणारे केक मुलांना खायला द्यायचे म्हणजे जरा टेन्शनच येते. तर नेहमीच बाहेरून केक मागवण्यापेक्षा तुम्ही यावेळी फक्त २ बिस्कीट पुड्यांपासून घरी केक (No Bake Chocolate Cake) बनवून पाहा आणि ही चॉकलेट केकची सोपी एकदा नक्की वाचा…

साहित्य (No Bake Cake Ingredients) –

  • दोन गोल्ड मारी बिस्किटचे पुडे
  • एक चमचा बटर
  • एक कप पिठीसाखर
  • १/२ कप कोको पावडर
  • २ ते ३ चमचे दूध
  • सजावटीसाठी बदाम फ्लेक्स

व्हिडीओ नक्की बघा…

https://www.instagram.com/reel/DGuqCKqIwbo/?igsh=ZHFxMnc5ZzZ4MTAz

कृती (No Bake Cake Recipe) –

  • मारी बिस्कीट घ्या त्यांना एकच्यावर एक असे बिस्किटांचे थर लावून घ्या.
  • एका पॅनमध्ये बटर वितळवा, नंतर त्यात पिठीसाखर , कोको पावडर आणि दूध मिसळून एक गुळगुळीत चॉकलेट पेस्ट बनवा.
  • बिस्किटांचे थर लावताना हे चॉकलेट मिश्रण त्यावर समान रीतीने पसरवा.
  • काही वेळ फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्या.
  • बाहेरील थर अधिक चॉकलेट मिश्रणाने झाकून, काट्याचा वापर करून एक फॅन्सी पॅटर्न तयार करा (जसा व्हिडीओत झाडाचा आकार देण्यात आला आहे).
  • त्यानंतर त्याला बदामांच्या तुकड्यांनी सजवा, थोडा सेट होऊ द्या आणि नंतर त्याचे तुकडे करा.
  • अशाप्रकारे फक्त २ बिस्कीट पुड्यांपासून तुमचा ‘नो बेक चॉकलेट केक’ (No Bake Chocolate Cake) तयार.

सकाळी किंवा संध्याकाळी आपण चहाबरोबर बिस्कीट खातो. तर त्याच बिस्किटांपासूनच आणि कोणतेही अतिरिक्त साहित्य न आणता तुम्ही घरच्या घरी अगदी १० मिनिटांत नो बेक चॉकलेट केक (No Bake Chocolate Cake) केक बनवू शकता. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @foodiefemmepooja या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो पाहून तुम्ही ही रेसिपी अगदी सहज बनवू शकता.

Story img Loader