[content_full]
माणूस सुरुवातीच्या काळात जंगलांमध्ये, गुहा शोधून त्यात राहत होता. कंदमुळं, मांस कच्चेच खात होता. माणसाची हळूहळू उत्क्रांती होत गेली, तसतसा तो बिघडत गेला. याच्यापलीकडेही काही खायच्या वस्तू असतात, याचा शोध त्याला लागत गेला. त्याच्या आवडीनिवडी बदलत गेल्या, त्याचे खाण्यापिण्याचे नखरे सुरू झाले. जो पदार्थ त्याला कच्चाच खायला आवडत होता, तो आता भाजून, तळून, उकडून, चिरून, कापून, ठेचून, किसून, वेगवेगळ्या प्रकारे खाण्याचा छंद त्याला लागला. मग त्या मूळ पदार्थात कांदा, लसूण, बटाटा, असलं काही ना काही घालून त्याची चव वाढवण्याचे उद्योग सुरू झाले. काही वनस्पतींची सुगंधी पानं, फळं, फुलं, सालं, मुळं वगैरे एकत्र करून त्यातून छान सुगंध आणि चव पदार्थाला आणता येते, याचा शोध लागल्यावर मसाले तयार झाले आणि माणसाचं खाद्यजीवन मसालेदार झालं. आता माणूस मूळच्या सवयी, पद्धती विसरून गेला आणि पाककृतीमधले नवेनवे शोध लावू लागला. अमक्यात तमकं मिसळलं तर काय होईल, तमकं अशा पद्धतीनं केलं तर कशी चव लागेल, याच्यावर प्रयोग सुरू झाले आणि वेगवेगळ्या पदार्थांचा जन्म झाला. काही पदार्थ इतर भागांत कसे बनतात, याचा अभ्यास सुरू झाला, कधी माहिती हस्तांतरित झाली आणि ते पदार्थ आता कुणाची मक्तेदारी न राहता सगळीकडे त्यांचा आस्वाद घेतला जाऊ लागला. काय तळायचं, काय आणि किती प्रमाणात भाजायचं, काय परतायचं, याचे निश्चित ठोकताळे ठरले. केवढा पदार्थ केला की किती जणांना पुरतो, त्याचा आकार केवढा हवा, हे निरीक्षणातून लक्षात येत गेलं. म्हणूनच भाजणीचा वडा अगदी चपटा झाला, बटाटेवडा फुगीर झाला, मेदूवड्याला मध्ये छिद्र आलं आणि आप्पे छोटे, पण गोल गरगरीत झाले. ते बनवण्यासाठी खास आप्पे पात्र तयार झालं. मग आप्प्यांनाही आपण `जास्त तळले जात नाही, कमी तेलात, कमी श्रमात, सहज बनतो` वगैरे मिरवता यायला लागलं. तांदूळ, उडीद डाळीचे आप्पे लोकप्रिय आहेतच, पण आज शिकूया मूग डाळ आणि ओट्सचे आप्पे.
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- अर्धी वाटी ओटस् ची पावडर
- पाव वाटी सालासकट मूग डाळ (छिलटा डाळ)
- अर्धी वाटी उडिद डाळ
- मीठ चवीनुसार
- १/४ टी-स्पून बेकिंग पावडर
- १/२ टी-स्पून तेल
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- उडीद डाळ आणि मूगडाळ वेगवेगळी धुवून पाणी घालून रात्रभर भिजवावी.
- दुसऱ्या दिवशी पाणी काढून टाकणे आणि डाळी एकत्र मिक्सरवर बारीक वाटून घ्याव्यात.
- वाटलेली डाळ ३ ते ४ तास झाकून ठेवावी.
- नंतर त्यात ओटस् पावडर, मीठ आणि बेकिंग पावडर घालून एकत्र करावे.
- आप्पे पात्रात तेल घालून त्यावर हे मिश्रण घालून चांगले सोनेरी रंग येईपर्यंत शिजवावे. (साधारण २ मिनिटे)
- २ मिनिटांनंतर पुन्हा आप्पे पलटून दुसऱ्या बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत शिजवून घ्यावेत. चटणी बरोबर गरमागरम सर्व्ह करावे.
[/one_third]
[/row]