Kanda Paratha : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पराठा खायला आवडतो. आपण अनेकदा मेथी, पालक, कोबी किंवा मिक्स व्हेज पराठा बनवून आवडीने खातो पण तुम्ही कधी कांदा पराठा खाल्ला आहे का? हो, कांदा पराठा अत्यंत पौष्टिक आणि खायला तितकाच टेस्टी असतो. हा पराठा तुम्ही घरच्या घरीसुद्धा बनवू शकता. कांदा पराठा कसा बनवायचा, चला तर ही सोपी रेसिपी जाणून घेऊ या.
साहित्य
- कणीक
- मैदा
- मीठ
- साखर
- तुपाचं मोहन
हेही वाचा : Coconut Saar : असे बनवा नारळाचे सार, ही सोपी रेसिपी नोट करा
मिश्रण
बारीक चिरलेले कांदे घ्यावे. त्यात चवीपुरतं मीठ आणि तिखट टाकावे. चिमुटभर साखर टाकावी. हे मिश्रण एकत्र करावे.
कृती
- मीठ-साखर आणि तुपाचं मोहन घालून कणीक आणि मैदा भिजवून घ्या.
- मध्यम आकाराचे बारा फुलके करावेत.
- आता एका फुलक्यावर कांद्याचं मिश्रण पसरावं.
- त्यावर दुसरा फुलका ठेवून कडाने चिकटवावा
- त्यानंतर हलक्या हातानं पराठा लाटावा व तव्यावर भाजावा
- आणि गरमागरम कांदा पराठा सर्व्ह करावा