How to make pancake recipe in marathi: नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तुम्ही बनाना पॅनकेक हा पदार्थ ट्राय करु शकता. हा पदार्थ एकदा खाल्यास याची चव तुम्ही विसरणार नाहीत आणि सोबतच हा पदार्थ हेल्दी सुद्धा आहे. हा पदार्थ केवळ तुम्हालाच नाही तर घरातील सर्वांनाच आवडेल. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा पदार्थ तयार करण्यासाठी तुम्हाला फार मेहनतही घ्यावी लागणार नाही. चला जाणून घेऊ हा खास मुगडाळ पॅनकेक तयार करण्याची पद्धत…
मुगडाळ पॅनकेक साहित्य
- १ वाटी मूग डाळ
- १/२ वाटी तांदळाचे पीठ
- २ ते तीन टेबलस्पून बारीक रवा
- २ हिरव्या मिरच्या
- भरपूर कोथिंबीर
- ७ ते आठ लसूण पाकळ्या
- १/२ इंच आले
- तेल
- एका गाजराचा कीस
- १ बारीक चिरलेला कांदा
मुगडाळ पॅनकेक कृती
सर्वप्रथम मुगडाळ स्वच्छ धुऊन एक दोन तास भिजत ठेवावे त्यानंतर त्यातले पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात मूग डाळ घ्यावी त्यातच हिरव्या मिरचीचे तुकडे,कोथंबीर, लसूण पाकळ्या, आले तांदळाचे पीठ आणि रवा घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यावे
बारीक वाटणे करता थोडेसे पाणी घालून घ्यावे डोशाचे बॅटर प्रमाणे बॅटर असावे.तयार बॅटर पधंरा मिनिट तसेच झाकून ठेवावे.
आता तयार बॅटर मध्ये किसलेले गाजर घालावे आवडत असल्यास बारीक चिरलेला कांदा घालावा चवी नुसार मीठ घालावे आणि पुन्हा एकदा सर्व मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे
आता तवा गरम करून घ्यावा आणि त्याला तेलाचा बोळा पुसून घ्यावा आणि मुगाचे पॅन केक कसे मिश्रण ओतून घ्यावे.
पॅन केक दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यावेत पुदिन्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी तसेच शेजवान चटणी किंवा एखाद्या डीप सोबत हे पॅनकेक खाण्यास द्यावे