How to make paneer hyderabadi recipe: तुम्हाला मलईदार आणि मसालेदार ग्रेव्ही आवडते? तर तुम्ही ही सोपी पनीर हैदराबादी रेसिपी घरी नक्की करून पाहा.विशेष म्हणजे ही खास डिश तयार करण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो. चला तर मग जाणून घेऊयात या खास डिशची रेसिपी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनीर हैदराबादी बनवण्यासाठी साहित्य

पनीर – ४०० ग्रॅम
कांदा – २ (मोठे)
हिरव्या मिरच्या – ३
पुदिन्याची पाने – १/२ कप
कोथिंबीर – १/२ कप
काजू – १०
लसूण पाकळ्या – १०
आले – २ इंच
तेल
लवंग – ३
दालचीनी – एक छोटी काडी
शाही जिरा – १/२ टीस्पून
लाल तिखट – १ टीस्पून
गरम मसाला – १/२ टीस्पून
धने पावडर – १/२ टीस्पून
हळद – १/२ टीस्पून
दही – १/२ कप
फ्रेश क्रीम – १/२ कप
कसुरी मेथी – १ चमचा
मीठ

हैदराबादी पनीर बनवण्याची कृती

पनीर हैदराबादी बनवण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये १ टेबलस्पून तेल गरम करा, त्यात पनीरचे तुकडे घाला आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळा.

यानंतर त्याच कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, आले आणि काजू घालून हलके तपकिरी होईपर्यंत तळा.

आता या सर्व गोष्टी थंड करून मिक्सरमध्ये टाका आणि पेस्ट तयार करा. आता एका कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करा आणि त्यात संपूर्ण गरम मसाला आणि मसाल्याची पेस्ट घाला.

हेही वाचा >> रोजच्या जेवणात भरपूर फायबर हवं, खा पारंपरिक लाल माठाची भाजी; घ्या सोपी रेसिपी

मसाल्यांचा कच्चा वास निघेपर्यंत मसाले ढवळत राहा. आता मसाला पावडर घाला आणि तेल वेगळे होईपर्यंत शिजवा. तुमच्या चवीनुसार ग्रेव्हीची कंसिस्टंसी करण्यासाठी पाणी आणि मीठ घाला.