Paneer Lollipop Recipe: पावसाळ्यात मूड एकदम फ्रेश होतो. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या प्रकारचे चटपटीत आणि गरम पदार्थ खाण्याची तल्लफ असते. या मोसमात विशेषतः लोक भजी खातात. पण, याव्यतिरिक्त चटपटीत खाण्याची इच्छा असेल तर आम्ही तुमच्यासाठी स्पायसी रेसिपी घेऊन आलो आहोत. पनीर लॉलीपॉप हा अनेकांची आवडती डिश आहे. ही क्रिस्पी, फ्लेवरफुल आणि बनवण्यास सोप्पी आहे. तसेच, हे जवळजवळ प्रत्येक प्रकारचे पेय – चहा, कॉफी, रस इत्यादींसह चांगले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पनीर लॉलीपॉप साहित्य –

  • १ कप पनीर
  • २ उकडलेले बटाटे
  • २ हिरव्या मिरच्या
  • १/२ शिमला मिर्ची
  • १ चम्मच आलं
  • १ चम्मच लसूण
  • १/२ चम्मच जीरा पावडर
  • १/२ चम्मच गरम मसाला पावडर
  • १/२ चम्मच चाट मसाला
  • १/४ वाटी चिरलेली कोथिंबीर
  • मीठ स्वादानुसार
  • लाल मिर्च पावडर स्वादानुसार
  • १ कप ब्रेड क्रंप्स
  • १/२ कप मैदा

पनीर लॉलीपॉप कृती –

  • एका कटोऱ्यामध्ये किसलेले पनीर घ्या आणि त्यात उकडलेले बटाटे घाला.
  • कोथिंबीर, चिरलेली शिमला मिर्च, मीठ, लाल तिखट, जिरेपूड, गरम मसाला, चाट मसाला, आले-लसूण पेस्ट घालून चांगले मिक्स करा.
  • १० मिनिटे थांबा आणि नंतर मिश्रणातून लहान गोळे बनवा.
  • मैदयाच्या पिठामध्ये ते गोळे मिश्रणामध्ये बुडवा आणि ब्रेडक्रंब्ससह कोट करा.
  • कढईत तेल गरम करून त्यात पनीर बॉल घाला, गोल्डन ब्राऊन होईस्तोवर तळा.

हेही वाचाBreakfast Recipe : अगदी कमी वेळेत बनवा आणि २० दिवस खा; पाहा डाळ कचोरीची भन्नाट रेसिपी

  • पनीर लॉलीपॉप खाण्यासाठी, एक टूथपिक घाला आणि केचअपसह गरम सर्व्ह करा.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make paneer lollipops ingredients for paneer lollipops recipe in marathi easy and testy recipes fo monsoon srk