How to Make Peanut Paneer: बहूतेक लोकांना पनीर खायला आवडते आणि पनीर प्रोटीनचा चांगला स्त्रोत मानला जातो. तुम्हाला हे माहित असेल की पनीर वेगवेगळ्या पदार्थांपासून जसे की, दूध, सोयाबीन तयार केले जाऊ शकते. पण तुम्हाला हे माहिती आहे का शेंगदाण्यापासून देखील पनीर तयार केले जाऊ शकते. आज आम्ही तुम्हाला शेंगदाण्यापासून पनीर कसे तयार करावे ह सांगणार आहोत.
शेंगदाण्यापासून बनवलेले पनीरची चव अगदी बाजारात मिळणाऱ्या पनीर सारखी असते. चला जाणून घेऊ या रेसिपी
शेंगदाण्यापासून पनीर तयार करण्याची रेसिपी
शेंगदाण्यापासून पनीर तयार करण्यासाठी साहित्य
- शेंगदाणे
- व्हिनेगर
- पाणी
हेही वाचा – Tips For Perfect Kadhi : तुम्ही केलेल्या कढीला चव येत नाही? फॉलो करा या टीप्स, लिहून घ्या सोपी रेसिपी
शेंगदाण्यापासून पनीर तयार करण्याची कृती
- १. एक वाटीमधेयो २ कप शेंगदाणे घ्या आणि त्यांना व्यवस्थित धुवून घ्या. त्यानंतर शेंगदाण्यांना एका वाटीमध्ये गरम पाण्यात १ तास भिजवत ठेवा.
- २. पुन्हा पाणी काढून टाका आणि शेंगदाण्याच्या दाण्यांना मिक्सरमध्ये टाका.
- ३. साधारण १/4 कप पाणी टाका आणि घट्ट पेस्ट तयार करून व्यवस्थित मिसळून घ्या. शेंगदाणे व्यवस्थित वाटले जातील आणि त्याची चांगली पेस्ट तयार होईल याकडे लक्ष द्या.
- ४. आता तयार शेंगदाण्यांची पेस्ट एका भांड्यात काढा. एका लीटर पाण्यामध्ये टाका. गॅस मध्यम आचेवर ठेव आणि पेस्ट पाणीमध्ये मिसळत नाही तोपर्यंत गॅस चालू ठेवा. शेंगादाण्यांचे दूध उकळण्याची गरज नाही, २-३ मिनिटांपर्यंत सतत ढवळल्यानंतर गॅस बंद करा.
- ५. मग हे मिश्रण एका कपड्याने गाळून घ्या. हे शेंगदाण्याचे दूध एका भांड्यात काढा आणि कपड्यामध्ये शिल्लक राहिलेले शेंगदाण्याचे लोणीपासून तुम्ही बर्फी इ. तयार करू शकता.
- ६. आता शेंगदाण्याच्या दुधाच्या पाण्याला मध्यम गॅसवर ठेवा. दरम्यान, पाण्यात ४ मोठे चमचे व्हिनेगर टाका. जेव्हा दुधामध्ये उकळी येईल तेव्हा गॅस बंद करा. पुन्हा व्हिनेगर टाकून सतत ढवळत राहा.
- ७. जेव्हा दूध फाटल्यामुळे शिल्लक राहिलेले मिश्रण भांड्यामध्ये टाका आणि ढवळक राहा. गाठी मोकळ्या होईपर्यंत मिश्रण सतत ढवळत राहा आणि सर्व गाठ मोकळ्या झाल्यानंतर तेव्हा ते व्यवस्थित गाळून घ्या. त्यासाठी एक मोठी चाळणी घ्या आणि ते मुलायम कापडाने झाका. व्हिनेगरचा सुगंध दूर करण्यासाठी दह्यामध्ये गार पाणी टाका.
- ८. आता मुलायम कापडाचे गाठोळी बांधा आणि जास्तीचे पाणी पिळून काढा. हे गाठोडे ताटात एखाद्या जड वस्तू ठेवून १ तासासाठी बाजूला राहू द्या.
हेही वाचा – इम्युनिटी बुस्टर आहे लिंबाच्या सालीची चटणी, जाणून घ्या रेसिपी
- ९. घरी तयार केलेले पनीर वापरासाठी तयार आहे.
- १०. स्टोरेज करताना एका भांड्यात थंड पाणी ठेवून त्यात पनीर ठेवून ते फ्रिजमध्ये ठेवाय या पनीरला दोन दिवस जास्त साठवू नका.