Paratha Making Tips: सकाळच्या नाश्त्यासाठी अनेक घरांमध्ये पराठे बनवले जातात. बटाटे, मेथी, पनीर यांपासून विविध प्रकारचे पराठे बनवले जातात. परंतु, कधी कधी घाई-गडबडीत पराठे बनवताना फुटतात आणि त्यातील सारण बाहेर येते. तसेच अनेकदा पराठे जास्त कडक होतात; ज्यामुळे पराठे खावेसे वाटत नाहीत. अशा वेळी तुम्ही पराठे बनविण्याच्या प्रक्रियेकडे लक्ष द्यायला हवे. कारण- या प्रक्रियेत पीठ मळण्यापासून ते भाजण्यापर्यंतच्या सर्व पायऱ्या महत्त्वाच्या असतात. आज आम्ही तुम्हाला याच संदर्भातील काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पराठे लाटताना फुटू नये यासाठी टिप्स

पराठे लाटताना फुटत असतील, तर पीठ भिजविताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. पराठ्याची कणीक जास्त मऊ झाली, तर पराठे लाटताना फाटू शकतात. अशा वेळी पराठा लाटण्यापूर्वी सारण भरल्यावर तो हातावर थोडा थापावा आणि नंतर पराठे लाटावेत.

पराठा लाटताना त्याच्या कडा थोड्या जाडसर ठेवाव्यात. पराठ्याच्या कडा जाडसर ठेवल्याने सारण बाहेर येत नाही.

तसेच पराठ्याचे पीठ मळताना आणि पराठा लाटताना मैद्याचा वापर करावा. मैद्यामुळे पराठा फुटत नाही.

अनेक जण पराठ्यात सारण भरल्यानंतर लगेच लाटायला सुरुवात करतात. मात्र, असे केल्यानेही पराठा फाटू शकतो. अशा वेळी पराठा हातावर थोडा थापावा आणि मग लाटण्यास सुरुवात करावी.

परफेक्ट पराठ्यासाठी लाटणे, सारण भरणे यांसह पराठा व्यवस्थित भाजणेदेखील गरजेचे आहे.

पराठा भाजताना एका बाजूने शेकावा. त्यानंतर दुसरी बाजू भाजावी. या ट्रिकने पराठ्यातील सारण घट्ट होते.

या टिप्स फॉलो केल्यास तुमचा पराठा कधीही फाटणार नाही.