Chai Recipe in Marathi: थंडीच्या दिवसात गरमागरम चहा पिण्याचा आनंद काही वेगळाच. एकदा चहा प्यायला की सतत पित राहावासा वाटतो पण घरी बनवलेला चहा कधी पांचट होतो तर कधी जास्त गोड तर कधी सर्व मटेरिअल घालूनही चहाला हवी तशी चव येत नाही. चहा हा कॉमन पदार्थ असला तरी ऑफिसच्या चहाची चव, टपरीवरच्या आणि घरच्या चहाची चव ही वेगळीच असते. चहाच्या टपरीवर मिळतो तसा परफेक्ट चहा करण्यासाठी तुम्हाला काही बेसिक स्टेप्स लक्षात ठेवाव्या लागतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रत्येक वेळी चहा परफेक्टच बनतो असं नाही. खरं तर चहा बनवताना आपण अनेकदा काही चुका करतो, ज्यामुळे त्याची चव खराब होते. पण, चहामधील वापरल्या जाणाऱ्या गोष्टी तर त्याच असतात, तरीही चहाची चव वेगळी कशी? मग चहा बनवण्याची योग्य पद्धत कोणती, तो कसा बनवायचा, याचा कधी विचार केला आहे का? खरंतर चहातील प्रत्येक पदार्थ एका विशिष्ट वेळेला टाकायचे असतात. आम्ही तुम्हाला चहा बनवण्याची खास पद्धत सांगणार आहोत.

  • चहा बनवताना ‘या’ चुका सर्वात आधी टाळा
  • सर्वप्रथम चहा बनवण्यासाठी कधीही कच्चे दूध वापरू नये. चहा बनवण्यासाठी फक्त उकळलेले दूध वापरण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही उकळत्या चहामध्ये थंड दूध घालता तेव्हा चहाचे तापमान अचानक बदलते, ज्यामुळे त्याची चव खराब होते.
  • अनेकदा घरी चहा बनवताना वेळ वाचवण्यासाठी लोक पाणी आणि दूध एकत्र करतात आणि उकळल्यावर आले घालतात. पण, या प्रक्रियेत मसाले आणि चहा पावडर व्यवस्थित मिसळायला वेळ मिळत नाही.
  • चहा बनवताना आधी पाणी उकळून घ्या. पाणी उकळायला लागल्यावर प्रथम ठेचलेले आले व इतर मसाले घाला. त्यांना या पाण्यात किमान एक मिनिट उकळू द्या, जेणेकरून मसाल्यांची चव चहामध्ये येईल. यानंतर या उकळत्या पाण्यात चहा पावडर टाका.
  • चहाच्या पावडरबरोबरच पुढच्या १० सेकंदात साखरही घाला. जर तुम्ही दुधात साखर घातली तर ते दूध पातळ करते.
  • चहा बनवताना तुमच्या लक्षात येईल की, अनेकदा चहा पावडर उकळताना भांड्याला चिकटून राहते. अशा परिस्थितीत, चमच्याच्या साहाय्याने आजूबाजूची चहा पावडर भांड्यात परत करणे महत्त्वाचे आहे.
  • दूध घातल्यानंतर चहाला किमान दोन मिनिटे उकळवा आणि हे मध्यम आचेवर करा.
  • असा बनवा तुमचा चहा… (परफेक्ट चहा रेसिपी)
  • दोन कप चहा बनवायचा असेल तर एक कप उकळलेले दूध काढून बाजूला ठेवा.
  • यानंतर दोन कप चहासाठी भांड्यात दोन कप पाणी घाला आणि ते उकळण्यासाठी मंद आचेवर ठेवा.
  • पाणी उकळल्यावर या उकळत्या पाण्यात ठेचलेले आले टाका. (तुम्ही मसाला चहा बनवत असाल तर तुम्ही वेलची, लवंगा किंवा इतर मसालेदेखील घालू शकता.)
  • हे पाणी किमान दोन मिनिटे उकळवा. या उकळत्या पाण्यात चहा पावडर घाला आणि पुन्हा दोन मिनिटे उकळा. त्यानंतर चहामध्ये साखर घाला.
  • यानंतर फ्रिजमधून थोडा वेळ बाहेर काढून ठेवलेले दूध घाला. (एकदम फ्रिजमधून काढलेलं दूध घालू नका) मधोमध एका चमचाच्या मदतीने चहा ढवळत राहा.
  • दोन मिनिटे दुधात उकळल्यानंतर चहा गाळून घ्या.
  • तुमचा परिपूर्ण चहा तयार आहे.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make perfect chai at home chaha kasa banavtat ea making recipe know step by step in marathi srk