इडली हे साऊथ इंडियन फूड असले तरीही जवळजवळ प्रत्येक भारतीय घरात ही आवडीने खाल्ली जाते. चवीने आणि पौष्टिकतेने परिपूर्ण असण्यासोबतच, इडली ही एक रेसिपी आहे जी कमी वेळात झटपट तयार करता येते. इडली आपण उडीद डाळीपासून करतो. पण आज आम्ही तुला रवा-उडीद-मुगाची झटपट बनवता येणारी इडली कशी बनवायची हे सांगणार आहोत. ही इडली चवीला अप्रतिम आणि हेल्दी आहे. जर तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी असेल, तर तुम्ही चिंता न करता तुमच्या नाश्त्यामध्ये या इडलीचा समावेश करू शकता.
जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य
- २ वाट्या रवा
- उडीद डाळ १ चमचा
- मुगडाळ १ चमचा
- ताक १ वाटी
- कोथिंबीर
- सैंधव चवीनुसार
( हे ही वाचा: वडापाव सोबत दिली जाणारी लाल सुकी लसूण चटणी घरी कशी बनवायची? जाणून घ्या सोपी रेसिपी)
कृती
- उडीद डाळ आणि मुगडाळ भाजून घ्यावी.
- वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्याव.
- तासभर आधी भिजून घालून ठेवावं.
- नंतर इडली पात्रात हे मिश्रण भरावं आणि २० मिनिटं मंद आचेवर शिजवावं. आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत खायला द्यावं.