एग रोल हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. रोज तेच तेच एग रोल खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही पेस्टो एग रोल ट्राय करू शकता. पेस्टो सॉसचा वापर करुन हा खास एग रोल तुम्ही काही मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवू शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी पेस्टो एग रोल हा बेस्ट पर्याय आहे. चला तर ही सोपी रेसिपी जाणून घेऊ या.
साहित्य –
- पेस्टो सॉस
- बेसिलची पाने १ वाटी
- बदाम ६-७
- शेंगदाणे अर्धा वाटी
- ऑलिव्ह ऑइल अर्धा वाटी
- मिरपूड २ चमचे
- मीठ चवीनुसार
हेही वाचा : Chanakya Niti : महिला नेहमी नोटीस करतात पुरुषांच्या ‘या’ सवयी, वाचा ‘चाणक्य नीती’ काय सांगते?
एग रोल –
- गव्हाचे पीठ दीड वाटी
- ड्राय वीस्ट १ चमचा
- कोमट पाणी दीड वाटी
- साखर अर्धा चमचा
- मीठ चवीनुसार
- बारीक चिरून २ उकडलेल्या अंड्याचा पांढरा भाग
- चिरलेला कांदा १
- चिरलेली सिमला मिरची १ वाटी
- बारीक चिरून हिरवी मिरची २
- बारीक चिरून लसूण २ पाकळ्या
- तेल १ चमचा
- कांदा आणि सिमला मिरचीचे पातळ लांब काप अर्धा वाटी
हेही वाचा : Gemini : मिथुन राशीच्या लोकांना समजून घेणे खूप अवघड, जाणून घ्या कसा असतो यांचा स्वभाव?
कृती-
- पेस्टो सॉस-बेसिलची पाने, बदाम, शेंगदाणे, मिरपूड आणि मीठ मिक्सरमध्ये बारीक करा. वाटताना थोडे थोडे ऑलिव्ह ऑइल घाला.
- पाणी घालू नका.
- मऊ पेस्ट बनवा.
- ड्राय यीस्ट, साखर आणि कोमट पाणी एकत्र करून १०-२० मिनिटे ठेवून द्या.
- नंतर गव्हामध्ये यीस्ट आणि मीठ, पाणी घालून कणीक मळा.
- झाकून १ तास ठेवून द्या. नंतर कणकेच्या ४ पोळ्या लाटून भाजून घ्या.
- स्टफिंग करण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून कांदा, मिरची, लसूण थोडी तळसून घ्या. चिरलेली सिमला मिरच घाला. २ मिनिटे परत उकडून नंतर अंड घाला. मीठ घाला.
- थोडे परतून गॅसवरून उतरवा. रोल बनवण्यासाठी पोळीला पेसो सॉस लावून घ्या. पोळीच्या बरोबर मध्ये स्टफिंग घाला.
- कांदा आणि सिमला मिरचीचे स्लाईसेस घाला. रोल करा आणि पेस्टो एग रोल तयार!