भारतात अनेक ठिकाणी मान्सूनचे आगमन झाले आहे. रिमझिम पाऊस पडत आहे. या अशा पावसाळी वातावरणात गरमागरम पकोडे खाण्याची मजा काही औरच आहे. म्हणूनच या पावसाळी वातावरणासाठी आम्ही तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहुयात पोह्यांचे रुचकर पकोडे तयार करण्याची सोपी रेसिपी.

पोहे पकोडे साहित्य

  • पोहे – दीड कप
  • उकडलेले बटाटे – २-३
  • हिरवी मिरची – १-२
  • लिंबाचा रस – १ टीस्पून
  • कोथिंबीर – २ चमचे
  • लाल तिखट – १/२ टीस्पून
  • जिरे – १/२ टीस्पून
  • साखर – १/२ टीस्पून
  • तेल – तळण्यासाठी
  • मीठ – चवीनुसार

पोहे पकोडे कृती

  • पोहे पकोडे बनवण्यासाठी प्रथम पोहे स्वच्छ करून चाळणीत ठेवा आणि पाण्याने धुवा. यानंतर पोहे थोडा वेळ बाजूला ठेवा.
  • यानंतर उकडलेल्या बटाट्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि हिरवी कोथिंबीर घातल्यानंतर एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये मॅश केलेले बटाटे आणि भिजवलेले पोहे एकत्र करा.
  • आता या मिश्रणात लाल तिखट, जिरे, साखर, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सर्व साहित्य घालून चांगले मिक्स करा. अशा प्रकारे पकोड्यांची पेस्ट तयार होईल.
  • आता कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात पोह्याचे मिश्रण पकोड्याच्या आकारात टाकून तळून घ्या. कढईत पकोडे टाकल्यावर २-३ मिनिटे परतून घ्या. पकोडे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

हेही वाचा – पावसाळ्यात बनवा गरमागरम खमंग आणि खुशखुशीत कोथिंबीर वडी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी

Vatli Dal Recipe
लाडक्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा स्वादिष्ट वाटली डाळ! लिहून घ्या रेसिपी
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Eid Miladunnabi utsav Committee Buldhana organized blood donation camp
बुलढाणा : संकलन साहित्य संपले, पण रक्तदात्यांची रांग कायम!
pune ganeshotsav 2024 marathi news
पुणे: देखावे पाहण्यासाठी उच्चांकी गर्दी, चौकाचौकातील स्थिरवादनामुळे नागरिकांना मनस्ताप
sahyadri sankalp society work for growth and conservation of ratnagiri forests
सर्वकार्येषु सर्वदा : पर्यावरण संवर्धनासाठी ‘सह्याद्री संकल्प’चे मदतीचे आवाहन
Bananas and Curd
केळी आणि दह्याचे एकत्रित सेवन लैंगिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
Two thieves who stole a two wheeler were arrested by Dehur Road Police of Pimpri Chinchwad
पिंपरी- चिंचवड: दारू आणि मौज मजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या जय-विरुला बेड्या; २१ दुचाकी जप्त
Shev Paratha Recipe in marathi how to make
मुलांच्या डब्यासाठी सकाळच्या घाईत झटपट बनवा शेव पराठा; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
  • यानंतर एका प्लेटमध्ये पकोडे काढा आणि गरमागरम सॉस आणि चहासोबत सर्व्ह करा.