Potato noodles recipe in marathi: सध्या फास्टफूड खाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. कित्येक लोकांना हाका किंवा शेजवान अशा चायनिज नूडल्स खायला आवडतात. पण या नूडल्स आरोग्यासाठी फायेदशीर आहेत का नाही याचा मात्र विचार कोणीच करत नाही. कित्येक जणांना चायनिज नूडल्स खाण्याऐवजी देशी नूडल्स खायला आवडतात. फास्ट फूडच्या नादात कित्येक लोक आपल्याकडी पांरपारिक पदार्थ खाणे विसरत चालले आहेत. तुम्ही कधी बटाट्यापासून बनवलेले नूडल्स खाल्ले आहेत का. चला आज बटाट्यापासून बनवलेले नूडल्सची रेसिपी पाहूयात.

बटाट्यापासून बनवलेले नूडल्स साहित्य

३ मोठ्या आकाराचे बटाटे

१०० ग्रॅम कॉर्न फ्लोअर

चवीनुसार मीठ

पाणी

बटाट्यापासून बनवलेले नूडल्स कृती

साधारण तीन ते चार बटाटे उकळून घ्या. थंड झाल्यावर त्याचे साल काढून टाका. नंतर हे बटाटे मॅशरच्या मदतीने मॅश करा. आता या बटाट्याच्या मिश्रणात कॉर्न फ्लोअर आणि मीठ मिक्स करा.

हे मिश्रण अगदी पिठासारखे मळून घ्या आणि घट्ट करा. आता हातात तेल घ्या आणि गुळगुळीत पृष्ठभागावर थोडे तेल लावा. आता थोडे तयार बटाट्याचे पीठ घ्या आणि हाताच्या मदतीने पातळ करत लाटण्यासारखा आकार द्या.

ते शक्य तितके पातळ करा. जेणेकरून त्याला नूडल्ससारखा आकार मिळेल. तसे ते नूडल्ससारखे एकदम पातळ करू नका अन्यथा ते तुटू लागतील. थोडे जाडसर ठेवा.

आता एका खोलगट भांड्यात पाणी गरम करून त्यात तयार नूडल्स टाका. दोन ते तीन मिनिटे शिजवा आणि बाहेर काढा. थंड पाण्याने धुवून बाजूला ठेवा. दुसऱ्या गॅसवर पॅन ठेवा आणि तेल घाला. नूडल्स तेलात तळण्यासाठी त्यात बारीक चिरलेला लसूण, चिली फ्लेक्स, सोया सॉस, चिली सॉस घाला.

हेही वाचा >> रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा पहाडी चणा डाळ रेसिपी; झक्कास होईल बेत

तुम्ही त्यात स्प्रिंग ओनियन आणि तुमच्या आवडीच्या भाज्या देखील घालू शकता. आता त्यात तयार नूडल्स घाला आणि हलक्या हाताने ढवळत मिक्स करा. तुमचे चविष्ट बटाटा नूडल्स तयार आहेत. गरमा गरम सर्व्ह करा.