Pudina Taak Recipe : उन्हाळ्यात अनेकजण आवर्जून ताक पितात. ताक हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आम्लपित्ताचा त्रास कमी करण्यासाठी, रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी ताक पिणे चांगले आहे, असे मानले जाते.
ताकामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्व असतात. पुदिना ताक तर अधिक फायदेशीर असते कारण पुदिन्यातील औषधी गुणधर्म अनेक आजारांपासून दूर ठेवते, असे मानले जाते. आज आपण घरच्या घरी पुदिना ताक कसे बनवायचे, हे जाणून घेऊ या.
साहित्य –
- अर्धी वाटी दही
- सैंधव मीठ
- आल्याचा तुकडा
- पुदिन्याची पाने
हेही वाचा : हेल्दी ओटस् आणि हनीपासून बनवा टेस्टी कुकीज, पाहा सोपी रेसिपी
कृती –
- पुदिना व आलं मिक्सरवर वाटून घ्या.
- दही घुसळून घ्या
- त्यात पुदिना आलं पेस्ट, मीठ, पाणी घालून एकजीव करा