Ragi Date and Walnut Cake Recipe : अनेकदा शाळेत आपण चिमुकल्यांना एक पोळी-भाजीचा आणि खाऊचा डब्बा देतो. खाऊच्या डब्यात चिप्स, विकतचे स्लाईज केक, बिस्किटे आदी अनेक पदार्थ देतो. लहान मुलांना केक खायला प्रचंड आवडतात. पण, सहसा आपण केक घरी बनवत नाही. तर आज सोशल मीडियावर एका युजरने रेसिपी दाखवली आहे, जी टेस्टी आणि हेल्दी सुद्धा आहे. तर आज आपण नाचणी, खजूर आणि अक्रोडचा केक (Ragi Date And Walnut Cake) कसा बनवायचा हे शिकणार आहोत.

साहित्य (Ragi Date & Walnut Cake Ingredient)

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

१२ खजूर (२२० ग्रॅम)

१ + १/२ कप गरम दूध (३७५ ग्रॅम)

१/२ कप वितळलेले बटर किंवा भाजीचे तेल (९५ ग्रॅम)

१/२ कप नाचणीचे पीठ (६० ग्रॅम)

१/२ कप गव्हाचे पीठ (६० ग्रॅम)

१/२ टीस्पून बेकिंग पावडर

१ चमचा बेकिंग सोडा

१/२ कप अक्रोड (चिरलेला) ५० ग्रॅम

मीठ

हेही वाचा…Methi Paratha Recipe : मेथीचे बनवा मऊसूत पराठे! हिवाळ्यात नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी बेस्ट रेसिपी

व्हिडीओ नक्की बघा…

कृती (How To Make Ragi Date & Walnut Cake) :

खजूर गरम दुधात २०मिनिटे भिजवून ठेवा. त्यामुळे ते मऊ होतील.

नंतर खजूर मऊ झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घाला आणि त्याची पेस्ट करून घ्य आणि एका वाडग्यात ठेवून द्या.

वितळलेले बटर किंवा भाजीचे तेल त्यात चांगल मिसळून घ्या.

नंतर हे मिश्रण एका भांड्यात घ्या आणि त्यात मैदा (नाचणी आणि गव्हाचे पीठ) बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घाला. मिश्रण चांगले फेटून घ्या.

७ इंच असलेल्या भांड्यात हे मिश्रण व्यवस्थित ठेवा आणि वरून अक्रोडने सजावट करा.

नंतर ८० अंश सेल्सिअस तापमानावर सुमारे ५० मिनिटे बेक करा.

अशाप्रकारे तुमचा हेल्दी आणि टेस्टी केक तयार (Ragi Date And Walnut Cake).

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @iamtarneet या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

आरोग्यदायी फायदे :

खजूर खाल्ल्याने हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारू शकते. कारण – खजुरामध्ये उच्च फायबर सामग्री आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर ठरतात. खजुराचे पाणी नियमितपणे प्यायल्याने हृदयाशी संबंधित समस्या टाळता येतात, तुमचे आरोग्य चांगले राहते. तर नाचणी शरीरासाठी आवश्यक असणारी प्रथिने, कर्बोदके, कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचे प्रमाणही भरपूर असते. ज्यामुळे आपली हाडे आणि दात मजबूत राहतात. गर्भवती महिलांसाठीही नाचणी अतिशय पौष्टिक समजली जाते.

Story img Loader