How to make ragi soup at home: हिवाळ्यात शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. सर्दी खोकला किंवा ताप आल्यानंतर काहीच खाण्याची इच्छा निर्माण होत नाही. आजारपणामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती आणि ऊर्जा कमी होऊन जाते. अशावेळी शरीराला पौष्टिक घटकांची आवश्यकता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नाचणीसाजे सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. नाचणी आरोग्यासाठी पौष्टिक आहे. नाचणीच्या पिठाचा वापर करून नाचणीची भाकरी, लाडू, नाचणी सत्व इत्यादी पदार्थ बनवले जातात. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पदार्थ खाण्याऐवजी गरम पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. चला तर जाणून घेऊया नाचणीचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाचणीच्या पीठाचे सूप तयार करण्यासाठी साहित्य

नाचणीच्या पीठाचा सूप तयार करण्यासाठी पनीर
फरसबी
वटाणे
गाजर
काळी मिरी पावडर
चवीनुसार मीठ

नाचणीच्या पीठाचे सूप बनवण्यासाठी कृती

सुरुवातीला आपण तुपामध्ये वटाणे, फरसबी, गाजर आणि पनीर सर्व एकत्र परतवून घ्यायचे आहेत. आणि अर्धा चमचा काळी मिरीची पावडर टाकावी. दुसरीकडे आपण पाणी गरम करुन घ्यायचे आहे.

भाज्या परतावल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला हवे तेवढे पाणी घालावे आणि 5 मिनिटे भाज्या या पाण्यात शिजवून घालाव्यात. त्यानंतर दुसरीकडे एका वाटीत नाचणीचे पीठ घ्यायचे.

नंतर नाचणीच्या पिठात देखील गरम पाणी टाकून ढवळून घ्यावे. नाचणीचे पीठ आणि गरम पाणी हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे.

मिश्रण जास्त घट्ट होणार नाही याची योग्य काळजी घ्यावी. पातळ झालेले मिश्रण आता शिजणाऱ्या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यावे.

हेही वाचा >> सर्दी, खोकला, कफ अन् तापाला दूर पळवणारा खास काढा; घरी बनवा १० मिनिटांत आयुर्वेदिक काढा

५ ते ७ मिनिटे फास्ट गॅसवर नाचणीच्या पिठाचे मिश्रण आणि भाज्या एकत्र शिजवून घ्यावे. अश्याप्रकारे तुमचे चविष्ट असे नाचणीच्या पिठाचे सूप तयार होईल.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make ragi soup at home winter special soup recipe nachani soup recipe in marathi srk