Ashadhi Ekadashi : उपवासाला गोड काय करायचं, हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो पण तुम्ही उपवासाला राजगिऱ्याचा पिठाचा शिरा बनवू शकता. अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे. राजगिरा हा अत्यंत पौष्टीक पदार्थ आहे. चविष्ट राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा कसा बनवायचा, जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य-

  • राजगिऱ्याचे पीठ
  • गूळ/साखर
  • पाणी किंवा दुध
  • तूप
  • इलायची पूड
  • बदामाचे काप

कृती-

  • सुरवातीला गरम कढईत तूप घाला आणि राजगिऱ्याचे पिठ भाजून घ्या
  • पिठ व्यवस्थित भाजले की त्यात थोडे थोडे गरम पाणी घाला आणि व्यवस्थित परतून घ्या
  • तुम्ही पाण्याऐवजी दुधसुद्धा टाकू शकता.
  • त्यानंतर आवडीनुसार सारख किंवा गुळ टाका
  • त्यात इलायची आणि ड्रायफ्रूट टाका
  • राजगिऱ्याचा शिरा तयार होणार
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make rajgira pithacha sheera recipe in marathi ashadhi ekadashi fast healthy food for foodie sweet dish ndj