दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ आता खूप लोकप्रिय होत आहेत. दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांचा उल्लेख करताच इडली, डोसा, सांभार ही नावं डोळ्यासमोर येतात, पण या स्वादिष्ट पदार्थांसोबतच रसम ही एक चविष्ट दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ आहे जी खूप आवडते. रसम हे एका मसालेदार सूपसारखे आहे ज्यामध्ये मसूर तयार करताना वापरला जात नाही. तसे, रसम अनेक प्रकारे बनवता येते. ही एक मसालेदार करी आहे आणि बहुतेकदा भाताबरोबर दिली जाते. त्यात घालण्यात आलेले देशी मसाले रस्समची चव खूप वाढवतात. जर तुम्हाला दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ आवडत असतील आणि नेहमी काही नवीन रेसिपी वापरण्याचा विचार करत असाल तर रसम हा एक उत्तम पर्याय असू शकतो. चला तर पाहबुयात रस्समची सोपी रेसिपी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिश्र भाज्यांचे रस्सम साहित्य

  • पिकलेले टोमॅटो, १ छोटा कांदा, १ छोटे बीट
  • १ छोटा बटाटा, २ वाट्या चिरलेल्या दुधी भोपळ्याच्या फोडी
  • १ चमचा आल्याचा कीस, २ मोठे चमचे रस्सम पावडर
  • अर्धा मोठा चमचा तूप, फोडणीसाठी जिरे
  • हिंग, कढीपत्ता, १ चमचा मीठ

मिश्र भाज्यांचे रस्सम कृती –

टोमॅटो, साल काढलेले बीट, कांदा, बटाटा, दुधी भोपळ्याच्या फोडी आणि आल्याचा कीस थोडे पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये एक शिट्टी काढून मऊ शिजवून घ्या. थंड झाल्यावर पाण्यासकट मिक्सरमधून,काढून घ्या. तयार झालेले मिश्रण सुपाच्या गाळणीतून गाळून घ्या. कढईमध्ये तूप गरम करून त्यात जिरे, हिंग, कढीपत्ता घालून खमंग फोडणी करा. त्यात भाज्यांचे मिश्रण, रस्सम पावडर आणि मीठ घालून पाच मिनिटे उकळू द्या. गरम असतानाच प्यायला द्या.

हेही वाचा – गोल्डन सूप; भूक लागल्यानंतर हे सूप नक्की ट्राय करुन बघा, ही घ्या सोपी मराठी रेसिपी

साऊथ इंडियन रसम’ ही रेसिपी कोणत्याही वेळी झटपट बनणारी रेसिपी असून चवीस एकदम स्वादिष्ट आहे. ‘साऊथ इंडियन रसम’ ही कमीत कमी सामग्रीत बनणारी व हेल्दी रेसिपी आहे.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make rasam know recipe tomato rasam recipe instant tomato saar recipe in marathi srk
Show comments