केळी हे असे फळ आहे जे तीनही ऋतूमध्ये उपलब्ध असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना केळी आवडतात. तुम्ही कधी केळीची भाजी खाल्ली आहे का? कच्च्या केळीपासून खूप पौष्टिक आणि तितकीच टेस्टी भाजी बनवता येते. ही भाजी कशी बनवायची, हे आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी ही सोपी रेसिपी नोट करा.
साहित्य
- कच्ची केळी
- तुरीची डाळ
- गूळ
- धने-जिरे पूड
- मेथी
- लाल तिखट
- कोथिंबीर
- खोबरं
- मीठ
हेही वाचा : Coconut Barfi : नारळी पौर्णिमेला बनवा खुसखुशीत नारळाच्या वड्या, ही सोपी रेसिपी नोट करा
कृती
- तुरीची डाळ भाजून घ्या
- त्यात एक चम्मच मेथी घालून परतून घ्या
- त्यानंतर कुकरमध्ये ही डाळ पाणी घालून शिजवा.
- केळीसुद्धा कुकरमध्ये शिजवून घ्यावीत .
- नंतर केलीची सालं काढून छोटे छोटे तुकडे करावेत .
- एका कढईत तेल घ्या.
- त्यात मोहरी हिंग आणि हळद घालून केळीच्या तुकड्यांना फोडणी द्या.
- त्यात शिजलेली डाळ टाका.
- त्यात चवीनुसार तिखट, मीठ आणि गूळ टाका
- आणि धने-जिरेपूड सुद्धा टाका.
- डाळ मंद आचेवर शिजू द्या
- त्यानंतर वरुन कोथिंबीर आणि खोबरं टाकून ही कच्च्या केळीची भाजी सर्व्ह करा.