Raw mango rasam recipe: रस्सम एक दक्षिण भारतीय पदार्थ आहे. कैरीच्या हंगामामध्ये कैरीचा वापर करुन खास रस्सम तयार केले जाते ज्याला मगई रस नावाने देखील ओळखले जाते. आंब्याचा रस्सम चवीला आंबट- गोड असतो जो प्रत्येकाला आवडतो. हा रस्सम तयार करणे अगदी सोपे आहे. जर तुम्ही काहीतरी नवीन ट्राय करत असाल तर यापेक्षा उत्तम पर्याय दुसरा काही असू शकत नाही. लंच असो किंवा डिनर तुम्ही कैरीचे रस्सम खाऊ शकता. चला जाणून घ्या कसा तयार करायचा कैरीचा रस्सम
कैरीचे रस्समची रेसिपी
कैरीचे रस्समसाठी साहित्य:
१ कैरी
२ कप पाणी
१ चमचा तूप
१टीस्पून मोहरी
१टीस्पून जिरे
१/२ चिमूटभर हिंग
१/२ टीस्पून आले (किसलेले)
३-४ लसूण पाकळ्या (ठेचून)
३ हिरव्या मिरच्या (चिरलेल्या)
१२-१५ कढीपत्ता
१/२ टीस्पून हळद पावडर
१/२ कप तूर डाळ (उकडलेली)
१ आणि १/२ टीस्पून रस्सम पावडर
मीठ
१ टीस्पून गूळ पावडर
४ कप पाणी
रस्समसाठी फोडणी कसा बनवायचा
१ चमचा तूप
१ टीस्पून मोहरी
२-३ सुक्या लाल मिरच्या
७-८ कढीपत्ता
हेही वाचा – दह्यातले वांग्याचे भरीत – खवय्यांसाठी रुचकर घरगुती पदार्थ! जाणून घ्या रेसिपी
कैरीची रस्सम कशी बनवायची:
सर्व प्रथम २ कैरी धुवून सोलून घ्या. यानंतर कैरीचे तुकडे करा. आता गॅसवर भांडे ठेवा ठेवा आणि त्यात २ कप पाणी घालून कैरीचे तुकडे उकळा. ते थोडे मऊ झाल्यावर गाळून घ्या आणि खाली एक वाटी ठेवा. चमच्याने दाबून, खाली असलेल्या भांड्यात कैरीचा गर काढत राहा.
कैरीचा गर रस्सम ग्रेव्हीमध्ये मिसळा
आता गॅसवर तवा ठेवा आणि त्यात १ चमचा तूप टाका आणि गरम करा. नंतर त्यात मोहरी, जिरे, हिंग, किसलेले आले, ३-४ लसूण, ३ लांबट चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून तळून घ्या. यानंतर त्यात हळद घाला आणि तयार कैरीचा गर मिक्स करा. आता त्यात अर्धी वाटी उकडलेली तूर डाळ मिक्स करा. यानंतर मसाल्यात लाल तिखट, रस्सम पावडर, चवीनुसार मीठ, गूळाची पूड घालून मिक्स करा. यानंतर 4 कप पाणी घालून झाकण ठेवून शिजू द्या. तुमची रस्सम 10 मिनिटात तयार होईल.
हेही वाचा – उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासह पचनक्रिया सुधारते ‘हे’ घरगुती पेय, जाणून घ्या रेसिपी
आता रस्सम साठी फोडणी तयार करा.
यासाठी कढई गरम करून त्यात १ चमचा तूप टाकून त्यात मोहरी, २-३ सुक्या लाल मिरच्या, ७-८ कढीपत्ता टाकून तळून घ्या. आता हे फोडणी रस्समवर ओता. तुमच्या कैरीची गोड आणि आंबट रस्सम तयार आहे. गरमागरम भात, लोणचे आणि पापडसह सर्व्ह करा.