[content_full]
`येताना आठवणीनं दळणाचा डबा घेऊन या. मला चकल्या करायच्या आहेत!` हे वाक्य गोविंदरावांनी मनावर अगदी पक्कं कोरलं होतं. कारण निदान ते वाक्य तरी लक्षात ठेवणं, हा आज त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न होता. साहेबांनी एकदा कुठलीतरी फाईल आणायला सांगितल्यावरही `हो, दळणाचा डबा घेऊन येतो,` असं उत्तर गोविंदरावांनी दिलं. घरातून निघताना `जाताना नाक्यावर हे दळण आठवणीनं टाका,` असं शैलाताईंनी बजावलं होतं. निघताना कुणीही आठवण न करता, गोविंदरावांनी दारापाशी ठेवलेला भाजणीच्या दळणाचा डबा आठवणीनं उचलला, तेव्हाच त्यांनी अर्धी बाजी जिंकली होती. पण तो पिठाच्या गिरणीत न टाकता चुकून office ला घेऊन आले होते. आता परत तो घेऊन घरी जाणं शक्य नव्हतं. संध्याकाळी जाताना दळण टाकू आणि दळूनच घेऊ, असा विचार त्यांनी केला होता, पण दुपारीच शैलाताईंचा फोन वाजला आणि त्यांच्या काळजात चर्रर्र झालं.
ऐन दिवाळीच्या सगळ्या उत्साहावर पाणी पडणार होतं. चकलीची भाजणी वेळेत का मिळाली नाही, याच्यावर एखादी थाप मारून नवखी बायको `चकली` असती, पण शैलाताई आता बऱ्याच रुळल्या होत्या. एवढ्या वर्षांत गोविंदरावांच्या सगळ्या चांगल्या (आणि बऱ्याचशा) वाईट सवयी त्यांना चांगल्याच माहिती झाल्या होत्या. संध्याकाळी दळणाचा डबा आठवणीने गिरणीत घेऊन जाण्याच्या धसक्याने गोविंदराव ऑफिसातून जरा लवकर निघाले आणि नेमके डबा ऑफिसातच विसरले. आता घरी सगळ्या पापांची कबुली देणं अनिवार्य होतं. पण तेवढ्यानं प्रायश्चित्त होणार नव्हतं. आणखी बरेच भोग गोविंदरावांच्या वाट्याला होते. `आता यंदा मी चकल्या करणारच नाही,` असं जाहीर करून शैलाताईंनी थेट बंडाचं निशाण फडकावलं. वाटाघाटींना यश येईना. `मी काहीही करून तुला आजच चकल्यांचं साहित्य आणून देतो,` असं गोविदरावांनी कबूल केलं, तेव्हा कुठे तोडग्याची अंधुक आशा दिसली. मग कुठूनशी त्यांनी तांदळाच्या चकल्यांची रेसिपी शोधून काढली आणि चकल्यांचं पीठ तयार झाल्यानंतरच शैलाताईंना हाक मारली. शैलाताईंनी मग प्रेमानं आणि उत्साहानं सगळ्यांसाठी चकल्या केल्या. तांदळाच्या चकल्यांची रेसिपी नक्की कुणी सांगितली, याबद्दल मात्र गोविंदरावांनी शेवटपर्यंत सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी चहाबरोबर चकली खाताना अचानक शैलाताईंना काहीतरी आठवलं आणि त्या म्हणाल्या, “परवा ती शेजारची नटवी तिच्या माहेरच्या तांदळाच्या चकल्यांचं कौतुक सांगायला आली होती घरी. तुम्ही काल नक्की रेसिपी कुणाकडून घेतलीत, हे बोलला नाहीत. अच्छा, म्हणजे तिच्याकडूनच तुम्ही….“ शैलाताईंना अचानक साक्षात्कार झाला आणि त्यांनी जाब विचारण्यासाठी समोर बघितलं. गोविंदराव तोपर्यंत जिना उतरून office च्या वाटेला लागले होते!
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- १ वाटी तांदळाचे पीठ
- १ वाटी पाणी
- पाव वाटी लोणी
- चवीपुरते मीठ
- १ टी स्पून जिरे.
- १ चमचा ओवा
- २ टीस्पून वाटलेली मिरची पेस्ट
- तळणीसाठी तेल
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- एका भांड्यात तांदळाचे पीठ घ्यावे.
- त्यात मीठ, लहान पातेल्यात पाणी गरम करावे.
- जिरे, ओवा, मिरची पेस्ट आणि लोणी घालावे.
- लोणी विरघळून पाणी उकळले, की लगेच ते तांदळाच्या पिठात घालून मिक्स करावे. 15 मिनिटे झाकून ठेवावे.
- हे मिश्रण कोमट झाले, की चांगले मळून घ्यावे.
- चकली यंत्रात पीठ घालून चकल्या कराव्यात.
- तेलात बदामी रंग येईपर्यंत तळून घ्याव्यात आणि शेजाऱ्यापाजाऱ्यांना सांगून, मिरवून खाव्यात.
[/one_third]
[/row]