अनेकदा उपवास म्हंटला की त्यादिवशी बटाटा, बटाट्याचे वेफर्स, वरी तांदूळ, साबुदाण्याचे थालीपीठ किंवा वडे असे पदार्थ बनवले जातात. काहीच नाही तर जरा वेगळा पदार्थ म्हणून, उपवासाची मिसळ केली जाते. मात्र त्यामध्येही बटाटा हा येतो. आता उपवास म्हंटला कि प्रत्येक पदार्थामध्ये बटाटा घालायलाच हवा असे काही नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुमचा जर उपवास असेल पण बटाटा घालून बनवलेला कोणताही पदार्थ किंवा साबुदाण्याची खिचडी खायची इच्छा नसेल; कंटाळा आलं असेल, तर उपवासाच्या भजीची रेसिपी नक्कीच बनवून पाहा. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर श्वेता फणसाळकर [Shweta phansalkar] नावाच्या व्यक्तीने, तिच्या अकाउंटवरून या साबुदाण्याच्या भजीची रेसिपी शेअर केली आहे. झटपट तयार होणारी आणि बटाटा न वापरता ही उपवासाची भजी कशी बनवायची ते पहा.

हेही वाचा : Recipe : प्रोटीन आणि फायबरयुक्त असा पौष्टीक हिरवा ढोकळा; काय आहे रेसिपी, प्रमाण पहा…

उपवासाची भजी रेसिपी :

साहित्य

साबुदाणा
उपवासाची भाजणी
दाण्याचे कूट
कोथिंबीर
मिरची/लाल तिखट
मीठ
साखर
ताक
तेल

हेही वाचा : Recipe : ‘या’ पद्धतीने बनवलीत तर सिमला मिरचीसुद्धा सगळे आवडीने खातील; भाजीची रेसिपी, प्रमाण लिहून घ्या….

कृती

सर्वप्रथम ४ ते ५ तासांसाठी साबुदाणा भिजवून ठेवावा.
एका बाउलमध्ये भिजवलेला साबुदाणा, भाजलेल्या दाण्याचे कूट, कोथिंबीर, बारीक चिरलेली मिरची किंवा लाल तिखट आणि मीठ घालून सर्व पदार्थ कालवून घ्या.
तुम्हाला हवे असल्यास चिमूठभर साखर घालू शकता.
त्यामध्ये उपवासाची भाजणी आणि थोडेसे पातळ ताक घालून भजीचे पीठ बनवून घ्या. पीठ खूप पातळ किंवा कोरडे राहणार नाही त्याची काळजी घ्यावी.

गॅसवर एक खोलगट कढई ठेऊन त्यामध्ये तळणीसाठी तेल तापवत ठेवा.
एक चमचाभर कडकडीत तापलेले तेल तयार भजीच्या पिठावर घालून घ्या.
आता एका चमच्याच्या मदतीने कढईत साबुदाण्याच्या भजीचे पीठ तळण्यासाठी सोडून द्या.
साबुदाण्याच्या भजीला खरपूस सोनेरी रंग आल्यांनतर, झाऱ्याच्या मदतीने कढईतील भजी काढून घ्या आणि एखाद्या टिशू पेपरवर ठेवा.
तयार आहे आपली कुरकुरीत उपवासाची स्वादिष्ट भजी.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @shweta.eats या अकाऊंटवरून ही भन्नाट रेसिपी शेअर झालेली आहे.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make sabudana bhaji for fast upvas without potato try this simple and tasty recipe dha