Sabudana Chivda: सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिना हा भक्ती आणि उपवासाचा महिना असतो. अनेकजण दर सोमवारी या महिन्यात उपवास करतात. उपवासाला नेहमी नेहमी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही श्रावण सोमवारी साबुदाणा चिवडा करू शकता. हा चिवडा अत्यंत टेस्टी असून करायलाही सोपी आहे. आज आपण साबुदाणा चिवडा घरी कसा बनवायचा, जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य

  • नायलॉन साबुदाणा
  • शेंगदाणे
  • खोबरे
  • तेल
  • जिरेपूड
  • तिखट
  • साखर

हेही वाचा : Kanda Paratha : असा बनवा खमंग पौष्टिक कांदा पराठा, ही सोपी रेसिपी नोट करा

कृती

  • साबुदाणा तळून घ्या.
  • त्या नंतर शेंगदाणे तळून घ्यावे
  • सुक्या खोबऱ्याचे पातळ काप तळून घ्यावे.
  • तळलेल्या साबुदाण्याला चवीपुरते मीठ, साखर, जिरेपूड, लाल तिखट लावून घ्यावे.
  • त्यात तळलेले शेंगदाणे, खोबऱ्याचे काप घाला.
  • सर्व एकत्र मिश्रण करा
  • साबुदाणा चिवडा तयार होणार.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make sabudana chivda recipe shravan somwar shravan month fast dish ndj
Show comments