अनेकांना साबुदाणा खिचडी खायला खूप आवडते. उपवासाला तर पोट भरुन साबुदाणा खिचडीचे सेवन केले जाते; मग ज्यांचा उपवास नसेल तेही आनंदाने याचा स्वाद घेताना दिसतात. खिचडीशिवायही साबूदाण्यापासून विविध पदार्थ तयार केले जात असतात. त्यात प्रामुख्याने साबुदाणा वडे, साबुदाणा खीर यांचा समावेश असतो. तर आज आपण ‘साबुदाण्याची पेज’ कशी बनवायची हे पाहणार आहोत. तुम्ही ही पेज तीन पद्धतीने बनवू शकता. चला तर आपण साबुदाण्याची पेज कशी बनवायची हे पाहूया.
साहित्य –
१. एक वाटी साबुदाणे
२. एक वाटी साखर
३. पाणी
कृती –
१. एक वाटी साबुदाणे घ्या.
२. अर्धी वाटी पाण्यात साबुदाणे पाच मिनिटे भिजवून घ्या.
३. नंतर गॅसवर एक टोप ठेवा त्यात दोन ग्लास पाणी टाका आणि उकळवून घ्या.
४. पाणी उकळल्यानंतर भिजत घातलेले साबुदाणे त्यात टाका आणि हलवत रहा.
५. साबुदाणे शिजल्यावर त्यात एक वाटी साखर घाला.
६. साखर व्यवस्थित विरघळू द्या.
७. अशाप्रकारे तुमची साबुदाण्याची पेज तयार.
हेही वाचा…Cauliflower Popcorn Recipe: फ्लॉवरपासून बनवा असे कुरकुरीत पॉपकॉर्न; सोपी रेसिपी लगेच नोट करून घ्या
तसेच जर तुम्हाला दुधात साबुदाण्याची पेज बनवायची असेल तर पुढील स्टेप्स फॉलो करा…
१. एक वाटी साबुदाणे घ्या.
२. अर्धी वाटी पाण्यात साबुदाणे पाच मिनिटे भिजवून घ्या.
३. नंतर गॅसवर एक टोप ठेवा त्यात दोन ग्लास दूध टाका आणि उकळवून घ्या.
४. पाणी उकळल्यानंतर भिजत घातलेले साबुदाणे त्यात टाका आणि हलवत रहा.
५. साबुदाणे शिजल्यावर त्यात एक वाटी साखर घाला.
६. साखर व्यवस्थित विरघळू द्या.
७. अशाप्रकारे तुमची दुधातील साबुदाण्याची पेज तयार.
(टीप – पेज खाताना दुधाबरोबर खावी म्हणजे त्याचा आनंद द्विगुणित होईल.)
तसेच तुम्ही साबुदाणे भाजून सुद्धा पेज तयार करू शकता… त्यासाठी कृती पुढीलप्रमाणे…
१. एक वाटी साबुदाणे तव्यावर भाजून घ्या.
२. अर्धी वाटी पाण्यात साबुदाणे पाच मिनिटे भिजवून घ्या.
३. नंतर गॅसवर एक टोप ठेवा त्यात दोन ग्लास पाणी टाका आणि उकळवून घ्या.
४. पाणी उकळल्यानंतर भिजत घातलेले साबुदाणे त्यात टाका आणि हलवत रहा.
५. साबुदाणे शिजल्यावर त्यात एक वाटी साखर घाला.
६. साखर व्यवस्थित विरघळू द्या.
७. अशाप्रकारे तुमची भाजून घेतलेल्या साबुदाण्याची पेज तयार.
तुम्ही तिन्ही पद्धतीने साबुदाण्याची पेज तयार करू शकता. प्रत्येकाची चव तुम्हाला नक्कीच वेगळी वाटेल. तसेच तुम्ही लहान पासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना ही पेज खायला देऊ शकता ; जी खूप पौष्टिक आणि चविष्ट आहे.
(टीप – पेज तयार करण्याआधी जर साबुदाणे पाण्यात भिजत घातले तर साबुदाणे शिजण्यास जास्त वेळ लागत नाही. )