सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे पावसाचा आनंद घेताना गरम गरम काहीतरी खावसं वाटतं. अनेकदा आपण गरमा गरम भजी करतो पण आज आम्ही तुम्हाला हटके आणि बेस्ट ऑप्शन सांगणार आहोत. तुम्ही टेस्टी समोसा बनवू शकता. जर हॉटेलसारखा कुरकुरीत समोसा तुम्हाला घरी बनवायचा असेल तर ही रेसिपी नोट करा.
साहित्य
- बटाटा
- मैदा
- गरम मसाला
- जिरे
- हिरव्या मिरच्या
- कढी पत्ता
- हिंग
- मटर
- धने
- तेल
- मीठ
- लाल तिखट
हेही वाचा : मऊ आणि लुसलुशीत भाकरी कशी बनवावी? जाणून घ्या सोप्या टिप्स
कृती
- सुरुवातीला बटाटे शिजवून घ्या.
- एका भांड्यात मैदा घ्या.
- मैद्यात ओवा, मीठ आणि पाणी टाकून पीठ मळून घ्या आणि २० मिनिटे झाकून ठेवा.
- शिजलेले बटाटे एका भांड्यात बारीक करा. त्यात धने, लिंबू आणि मीठ टाका. सर्व मिश्रण एकत्र करा.
- गॅसवर कढई ठेवा आणि त्यात तेल टाका.
- तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे, मोहरी, कडीपत्ता, हिंग, हिरवी मिरची याचा तडका द्या.
- आता त्यामध्ये बटाट्याचे मिश्रण टाका आणि चांगले मिक्स करा.
- ही बटाट्याची भाजी चांगल्याने शिजू द्या.
- भाजी शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि भाजीवर चिरलेला कोथिंबीर टाका.
- आता मळून ठेवलेल्या पीठाच्या चपात्या लाटा आणि या चपात्यांना समोस्याचा आकार देत त्यात ही बटाट्याची भाजी भरा आणि समोश्याचे कोपरे नीट बंद करा.
- हे समोसे गरम तेलातून काढा. (तेल जास्त गरम होऊ देऊ नका) मंद आचेवर समोसे तळा. अशाप्रकारे घरच्या घरी हॉटेलसारखे गरमा गरम समोसे तयार होणार. (टीप: समोस्याचा आकार कसा बनवायचा, यासाठी तुम्ही युट्यूबचा वापर करू शकता.)