Shevgyachya Shengachi Bhaji Recipe In Marathi : सकाळी ऑफिसला डब्यात कोणी भाजी घेऊन जायची असा प्रश्न आपल्यातील अनेकांना पडलेला असतो. भेंडी, कोबी, मसूर, बटाटा अशा नेहमीच्या भाज्या डब्याला घेऊन जायला आणि खायला आपल्यातील अनेकांनाच कंटाळा येतो. तर आज अगदी काही मिनिटांत होणारी मसालेदार भाजीची रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. शेवग्याची शेंग आमटीत दिसली की, अनेकांना रहावत नाही, अगदी तोंडाला पाणी सुटते आणि कधी खातो असे होऊन जाते. तर आज आपण चटपटीत, शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत.
साहित्य (Shevgyachya Shengachi Bhaji Ingredient)
- ४ शेवग्याच्या शेंगा
- राई-जिरं-कडीपत्ता
- मसाला, मिठ, हळद
- वाटीभर खोबरं
- खसखस
- लसूण
- टोमॅटो
- तीळ
- आलं
कशी बनवायची शेवग्याच्या शेंगाची भाजी (How To Make Shevgyachya Shengachi Bhaji)
- ४ शेवग्याच्या शेंगा मार्केटमधून आणा.
- शेंगा तुम्ही कुकरला २ शिट्या देऊन किंवा तुम्ही पाण्यात सुद्धा उकळवून घेऊ शकता.
- त्यानंतर दुसरीकडे वाटीभर खोबरं, तीळ, खसखस, लसूण, आलं, टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
- नंतर गॅसवर टोप ठेवा, त्याच्यात तेल ओता.
- राई-जिरं-कडीपत्ताची फोडणी द्या.
- नंतर त्यात मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं वाटण घाला.
- मसाला, मिठ, हळद घालून हलवून घ्या.
- नंतर चांगल भाजून घेतलेल्यावर त्यात शेंगा टाका.
- थोडं हलवून घ्या आणि पाणी घाला.
- अशाप्रकारे शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार.
शेवग्याच्या शेंगा, पानं, फुलं या सगळ्यांचा भाजीत वापर करतात. या झाडाला ‘पॉवर हाऊस ऑफ मिनरल्स’ म्हणतात. कारण याच्या शेंगा, पानं, फुलं ही अनेक जीवनसत्त्वं आणि खनिजं यांनी समृद्ध आहेत. पानांमध्ये बी ६, फॉलेट, थायमिन असून त्यात अ, क आणि के जीवनसत्त्वं आहेत. शिवाय कॅल्शियम, लोह, कॉपर आणि मँगेनीज आहे. शेवग्याच्या शेंगा घालून केलेलं पिठलं किंवा आमटी किंवा सांबार फारच चविष्ट लागतं. तर आज तुम्ही शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवून तुमच्याही कुटुंबातील सदस्यांनी हेल्दी ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न करा.