लोणचे टिकाऊ असते पण करंदीचे लोणचे बाहेर फार काळ टिकत नाही. फ्रिजमध्ये ७-८ दिवस राहू शकते. (पण ते राहीलच याची खात्री नाही कारण उरतच नाही.) डाळीतोय, सोलकढी शीत आणि हे लोणचे म्हणजे सारस्वत मन तृप्त झाले पाहिजे. पावसाळ्यात सुरुवातीला जी करंदी येते, त्या करंदीचे हे लोणचे होते. जर ती मिळाली नाही तर छोट्या कोलंबीचे करू शकता पण यासाठी मोठी कोलंबी शक्यतो वापरू नये.
साहित्य –
- सोललेली करंदी / छोटी कोलंबी एक मोठी वाटी,
- मोहरी १ चमचा
- मेथी दाणे पाव चमचा
- एका लहान लिंबाएवढा चिंचेचा कोळ
- हिंग
- लाल तिखट
- हळद
- मीठ
- तेल
हेही वाचा : तांदळाच्या शेवय्या; एकदम परफेक्ट बनतील एकदा ‘ही; ट्रिक वापरा
कृती –
- १. करंदी असेल तर चाळणीतूनच अलगद धुवा. फार चोळू नका. कोलंबी नेहमीप्रमाणे धुऊन घ्या व निथळा.
- २. तेलाची फोडणी करून मोहरी, हिंग घाला. नंतर मेथी दाणे घाला. बाजूला काढून मिक्सरमधून अथवा खलबत्त्यामध्ये कुटून घ्या.
पाणी घालू नका. - ३. त्याच कढईत अजून थोडे तेल घालून गरम करा. त्यात धुतलेली आणि हळद लावलेली करंदी घालून मंद गॅसवर व्यवस्थित परता. शक्यतो चमच्याने हळूहळू वरखाली करा.
- ४. करंदी असेल तर पाच मिनिटात आणि कोलंबी १० मिनिटात होते. आता त्यात मोहरी, मेथी, हिंग, भरडपूड, लाल तिखट, चिंचेचा कोळ घाला आणि मंद आगीवर ५-७ मिनिटे शिजवा.
- ५.सर्वात शेवटी मीठ घाला. थंड झाले की काचेच्या भांड्यात काढून फ्रिजमध्ये ठेवा. तेल जरा अधिकच घाला.
- ६.करंदी शिजवताना फेसासारखे पाणी सोडते. ते आटेपर्यंत गॅसवर ठेवणे आवश्यक आहे.